एखाद्याची पारख करताना लक्षात ठेवाय 'या' 5 गोष्टी

एखाद्याची पारख करताना लक्षात ठेवाय 'या' 5 गोष्टी

एखाद्याची भेट झाल्यनंतर सकारात्मक लहरी निर्माण झाल्याचा अनुभव तुम्ही कधी घेतलाय का?

  • Share this:

मुंबई, 21 जून : एखाद्याची भेट झाल्यनंतर सकारात्मक लहरी निर्माण झाल्याचा अनुभव तुम्ही कधी घेतलाय का? तसंच एखाद्याची पारख करताना तुमच्याकडून चूक झाली का? असं घडू शकतं. आपण नेहमी चांगल्या गोष्टी पाहून इतरांकडून शिकण्याची तयारी ठेवायला हवी.

1 - लाकांचं निरीक्षण करणे ही एक कला आहे. एखादी व्यक्ती कशी बोलते, उभी राहते, भावना कशा पद्धतीने व्यक्त करते यावरून ती व्यक्ती कशी आहे हे कळतं. त्यांच्यातील गुण पाहा. नम्रता, मृदूता, सभ्यता असे गुण आपण त्यांच्याकडून शिकू शकतो.

लोकांना स्वभाव ओळखण्यासाठी फायद्याच्या ठरतील तुम्हाला 'या' 5 टिप्स

2 - प्रत्येक व्यक्तीममध्ये फक्त अवगुणच असतात असं नव्हे, तर चांगले गुणसुद्धा असतात. त्यामुळे बरोबर आणि चूक यातील फरक ओळखायला शिका आणि चांगल्या गोष्टींवर भर द्या

3 - जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीमध्ये चांगले गुण शोधता, तेव्हा त्याचे काही अवगुणसुद्धा समोर येतात. तेव्हा तुम्ही त्याच्या अवगुणांकडे, वाईट सवयींकडे दुर्लक्ष करावं. कारण त्या सवयी म्हणजे ती संपूर्ण व्यक्ती नव्हे. त्याच्यातील फक्त चांगल्या सवयी आणि गोष्टी विचारात घेतल्या तर तुमचा दृष्टीकोन नक्कीच बदलतो.

4 - काहीजणांकडे सगळ्या वाईट सवयींचाच भरणा असतो. अशावेळी त्यांच्यातल्या चांगल्या सवयी शोधा. खूप प्रयत्न केल्यानंतर कदाचित तुमच्या हाती काहीतरी चांगलं लागू शकतं. पण त्यासाठी एवढा वेळ घालवण्याची अजिबात गरज नसते. कुठल्याही व्यक्तीशी वागताना हुशारीने वागा. प्रत्येकाकडे काहीतरी चांगलं गवसतं. फक्त त्यासाठी किती वेळ घालवायचा हे तुम्हालाच ठरवावं लागतं.

योग्यवेळी 'नाही' म्हणण्याचं धाडस तुम्ही दाखवायलाच हवं

5 - तुमच्यासाठी कुणी काही केलं तर त्याला धन्यवाद देणं आणि तसं बोलून दाखवणं गरजेचं असतं. त्याच्या कामाची किंवा वागण्याची जर तुम्ही दखल घेतली तर ते तुमच्याशी आणि सोबतच इतरांशीही आणखी चांगले आणि आपुलकीने वागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Jun 21, 2019 08:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading