तणावमुक्त जीवन जगायचं असेल, तर दररोज करा 'या' 5 आवश्यक गोष्टी

तणावमुक्त जीवन जगायचं असेल, तर दररोज करा 'या' 5 आवश्यक गोष्टी

धकाधकीच्या या जीवनात प्रत्येकजण ताण तणाव घेऊन वावरत असतो

  • Share this:

मुंबई, 22 जून : धकाधकीच्या या जीवनात प्रत्येकजण ताण तणाव घेऊन वावरत असतो. जर तुम्हाला तणावमुक्त जीवन जगायचं असेल, तर तुम्हाला नेहमी नित्यक्रमाचं पालन करावं लागेल. दिवसभराचं नियोजन केल्यानंतर त्याचं पालन करताना तुमची सगळी कामं वेळेत पूर्ण होतात आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो. ज्याचा उपयोग तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी वापरू शकता.

आजचं काम उद्यावर नको - उद्या हा कधीच येत नसतो. त्यामुळे आजचं काम हे कधीच उद्यावर ढकलू नका. ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा कामं रेंगाळल्याने आणखी तणाव निर्माण होतो.

टेंशन जाईल पेंशन घ्यायला; जॉबच्या पहिल्या दिवसासाठी उपयुक्त आहेत 'या' टिप्स

संकटांचा धैर्याने सामना करा - जर तुम्ही एखाद्या वाईट परिस्थितीत असाल किंवा तुमचा एखादा निर्णय चुकला असेल तर त्यावेळी त्यांना घाबरुन पळवाटा शोधण्याऐवजी त्यांचा धैर्याने सामना करा. असं केल्याने तुमच्या विचारक्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो. जे भविष्यात कठीण काळात लढण्यासाठी तुम्हाला मजबूत बनवतं.

सकाळी लवकर उठा - रात्री लवकर झोपून सकाळी शक्य तितक्या लवकर उठा. यामुळे तुमची दैनंदीन कामे वेळेवर पूर्ण होतात.

शरीराला आणि मनाला आराम - तणावमुक्त राहण्यासाठी सगळ्यात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे आपल्या शरीराला आणि मनाला आराम द्या. सतत काम केल्याने तुमचं शरीर आणि डोकं दोन्ही थकतं. अशावेळी जर त्यांना विश्रांती दिली तर तुम्ही मन शांत आणि संयमी बनतं.

टक्केवारी कितीही मिळवा; यशस्वी होण्यासाठी 'ही' कौशल्ये तुमच्यात असायलाच हवी

यादी तयार करा - अनेक गोष्टी अशा असतात ज्या आठवल्यानंतर तुम्हाला आनंद होतो आणि तुम्ही आशावादी बनता. अशा गोष्टींची तुम्ही एक यादी तयार करा. हे तंत्र तुमचा तणाव सकारात्मक पद्धतीने कमी करण्यास मदत करतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Jun 22, 2019 10:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading