सावधान ! वजन कमी करण्यासाठी तुम्ही रात्री जेवत नाही? मग हे नक्की वाचा

सावधान ! वजन कमी करण्यासाठी तुम्ही रात्री जेवत नाही? मग हे नक्की वाचा

Life Style बऱ्याच जणी रात्रीचं जेवण करणं टाळतात आणि तशाच रिकाम्या पोटी झोपतात. ही सवय तुम्हाला महागात पडू शकते.

  • Share this:

झिरो फिगरची क्रेझ आजही कायम महिला वर्गामध्ये कायम आहे. बहुतांश महिलांना सडपातळ बांधा हवा असतो. शारीरिक वजन करण्याच्या हट्टापायी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट केले जातात. कित्येकदा तर दिवसातून एकदाच जेवण केलं जातं. बऱ्याच जणी रात्रीचं जेवण करणं टाळतात आणि तशाच रिकाम्या पोटी झोपतात. असं म्हणतात रात्रीच्या वेळेस शरीररात चयापचयचा क्षमता कमी होते, ज्यामुळे जेवण योग्यरितीनं पचत नाही. यामुळे वजन वाढू लागते. याच कारणामुळे अनेक जण रात्रीचं जेवण करणंच वर्ज्य करतात. पण जर तुम्ही असं करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होण्याची शक्यता आहे.

(पाहा :SPECIAL REPORT : घटस्फोटाचं कारण ठरतोय मोबाईल)

जाणून घेऊया उपाशी पोटी झोपण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

आपल्या शरीरात मायक्रोन्यूट्रिशनलची कमतरता होते. म्हणजे शरीरात आवश्यक असलेल्या पोषक तत्त्वांचा अभाव होतो. शरीररुपी यंत्र सुरळीत चालण्यासाठी काही पोषक तत्त्वांची आवश्यकता असते, ज्यांना विज्ञानाच्या भाषेत मायक्रो न्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. यामध्ये मॅग्नेशिअम, जीवनसत्व बी13 आणि जीवनसत्व डी 3 इत्यादींचा समावेश असतो. ही पोषक तत्त्वं शरीराला मिळाली नाही तर शारीरिक विकास खुंटतो. रात्रीचं जेवण केलं नाही तर शरीराच्या आतील यंत्रणेत बिघाड होतो आणि यामुळे इंसुलिनचा स्तरदेखील खालवतो. तसंच याचा थेट परिणाम हार्मोन्स, कॉलेस्ट्रॉल आणि थायरॉईडवरही होतो, ज्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो.

(वाचा :आठवडा सुरळीत जाण्यासाठी दर रविवारी करा 'या' 5 गोष्टी)

वजन कमी करण्याच्या नादात अनेक जण रात्रीचं जेवण करणं सोडून देतात. पण ही सवय निरोगी शरीरासाठी अतिशय घातक ठरू शकते. रात्रीच्या वेळेस जेवणाचं पचन अतिशय मंदगतीनं होतं ही बाब खरी आहे. म्हणून रात्रीचं जेवणचं वर्ज्य करणं शरीरासाठी अतिशय घातक ठरू शकतं.

(वाचा :अर्धवट झोपेमुळे तरुणांना होऊ शकतो 'हा' गंभीर आजार)

झोपणं आणि रात्रीचं जेवण यामध्ये चार तासांचं अंतर ठेवणं आवश्यक आहे. रात्रीच्या वेळेस पचनास हलका असा आहार करावा, याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणामदेखील होणार नाही आणि पचनाचंही कार्य सुरळीत पार पडेल.

शरीराला अपाय होणार नाही, अशा सवयी वेळीच टाळणं निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील.

VIDEO: नाणेघाटातील अद्भूत निसर्गाचं सौंदर्य

First published: July 7, 2019, 9:19 PM IST

ताज्या बातम्या