तुम्हालाही जास्त गोड खाण्याची सवय आहे? मग वेळीच व्हा सावध

तुम्हालाही जास्त गोड खाण्याची सवय आहे? मग वेळीच व्हा सावध

तुम्हालाही जेवणानंतर किंवा झोपेतून उठल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय आहे? स्वयंपाक घरात जाऊन चमचाभर साखर खाण्याची सवय आहे?

  • Share this:

तुम्हालाही जेवणानंतर किंवा झोपेतून उठल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय आहे? स्वयंपाक घरात जाऊन चमचाभर साखर खाण्याची सवय आहे? एखाद्या मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर गोड खाल्ल्याशिवाय तुम्ही परतत नाही? या सर्व प्रश्नांची तुम्ही 'हो' असं उत्तर दिलं असेल तर एकूणच तुम्हाला गोड पदार्थ खाण्याचं व्यसनच आहे. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. गरजेपेक्षा अधिक साखरेचे सेवन केल्यास तुम्हाला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

अति गोड पदार्थ खाल्ल्यानं होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

1. साखरेचं अति प्रमाण असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यास तुम्हाला मधुमेह होऊ शकतो. गोड खाल्ल्यानं वजनदेखील वाढतं.

2. एचडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊ लागतं. शरीरातील एचडीएलचं प्रमाण कमी झाल्यास हृदयसंबंधित गंभीर आजार होण्याचा धोका निर्माण होतो.

(वाचा : ऑफिसमध्ये बसून वाढतंय वजन, मग कॉफीत घाला हे तेल)

3. दातांसाठी साखर अत्यंत वाईट आहे. कारण यामुळे तोंडात जंतू-जीवाणू वाढण्याची समस्या निर्माण होते.

(वाचा :प्रियांका चोप्राला फिट ठेवते ही डिश, दररोज करते एकाच पद्धतीचं जेवण)

4. साखरेत असलेल्या फ्रुक्टोजमुळे आपल्या यकृतावर घातक परिणाम होतात. साखरेतला हा घटक आपल्या यकृताला चरबीयुक्त बनवतो. यामुळे कॅन्सराचाही धोका निर्माण होतो.

(वाचा : Health Conscious असाल तर फिरायलाही जगातल्या या सर्वात निरोगी देशांमध्ये जा)

5. आयुर्वेद शास्त्रानुसार जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळं जर तुम्हाला गोड पदार्थ खायचा असेल तर जेवणाच्या अर्धा तास आधी खा आणि नंतर जेवण करावं. तज्ज्ञांच्या मते, गोड पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळं जेवणाच्या सुरूवातीलाच त्यांचं सेवन केल्यानं पदार्थाचं पचन चांगलं होतं, शिवाय गोड पदार्थ खाल्ल्यानं पुढच्या जेवणाचं प्रमाणही कमी होतं.

गणेशोत्सवाच्या शेवटच्या 6 दिवसांत रात्री 12पर्यंत स्पीकर्सना परवानगी

Published by: Akshay Shitole
First published: August 31, 2019, 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading