रोज एक ग्लास दूध घ्या आणि 'या' आजारांपासून दूर रहा

रोज एक ग्लास दूध घ्या आणि 'या' आजारांपासून दूर रहा

रोज एक ग्लास दुधातून आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, सेलानियम, विटामिन ए आणि बी-12 मिळतं.

  • Share this:

कोल्डड्रिंग आणि चहा कॉफी यापेक्षा कायमच प्रत्येकवेळी दूध पिण्यावर प्रत्येक घरात भर दिला जातो. आपल्याकडे दुधाला हेल्दी ड्रिंक म्हणून ओळखलं जातं. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकानं दूध घ्यावं असं म्हटलं जातं ते यामुळेच. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ हे शरीरासाठी चांगले असतात. रोज दूध पिण्यामुळे हाडांची मजबूती टिकवण्याचं काम करतं. त्यामुळे बऱ्याचदा लहान मुलांना वयोवृद्धांना आणि विशेषत: महिलांना दूध घेण्याचा सल्ला कायम डॉक्टर देतात. दूध हे केवळ हेल्दी ड्रिंकच नाही तर मोठ्या आजारांवरील सर्वोत्तम उपाय म्हणूनही काम करतं. त्यातही गायीचं दूध आणि तुपाला आयुर्वेदात महत्त्व आहे.

अस्थमा, डायबिटीस, कॅन्सर, कार्डियो वॅसकुलर, मेटाबोलिक सिंड्रोम, कोलन यासारख्या आजारांपासून तुम्हाला दूर ठेवतं. असं 'एडवांसेस इन न्यूट्रिशन' जनरलच्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे.याशिवाय गर्भावस्थेत महिलांनी दूधाचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास पोटात असणाऱ्या बाळाचं वजन, सुदृढ होण्यास मदत होते. मात्र हे डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावं. रिसर्चनुसार बोन मिनरल डेन्सिटी, मांसपेशि, प्रेग्नेंसी आणि ब्रेस्टफीडिंगसाठी दूध उत्तम पर्याय आहे.

दूधात अधिक पोषक तत्व असतात. त्यापासून आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, सेलानियम, विटामिन ए आणि बी-12 मिळतं. एक ग्लास दूध घेतल्यामुळे पौष्टिक तत्वही मिळतात आणि भूकही शमते. उकळून थंड केलेलं दूध रोज रात्री घेणं हा अॅसिडिवर सर्वोत्तम पर्याय आहे.

लय भारी! शेतकऱ्यांसाठी स्मार्ट प्रकल्प, एका क्लिकवर 13 योजनांचा लाभ

दूधाचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

दुधामुळे बुद्धी तल्लख रहाते. पौष्टिक तत्वांमुळे शरीरात ताकद येते.

दूधात वेलची किंवा दूधात थोडी हळद घालून घेतल्यानं सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो.

रोज दूध प्यायल्यानं तुमच्या शरीरातील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा तजेलदार दिसते.हे सगळे दुधाचे फायदे असले तरी प्रत्येकालाच दूध घेतल्यानं फायदा होतोच असं नाही. काही वेळा दूधाच्या चुकीच्या सेवनामुळे  किंवा दूधानंही त्रास होऊ शकतो. तसंच दूध घेण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत ते तुम्हाला माहीत आहेत का?

दूधाचं अतिसेवन केल्यानं भूक मरते. पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो.

बऱ्याचदा कच्चे दूध प्यायल्यानं अपचनाचा त्रास होऊ शकतो.

दूधात जरी चांगले बॅक्टेरिया असले तरीही फूड इन्फेक्शन झालेल्यांनी दुधाचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानं करावं.

दूध पचनासाठी जड असल्यानं पोट फुगणे, गॅस यांसारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.रोज सकाळी आणि रात्री दूध प्या आणि तंदूरूस्त रहा असं अनेकवेळा म्हटलं जातं. मात्र दूध हे डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावं. बऱ्याचवेळी आपल्या शरीराच पचनक्रियेसाठी दूध योग्य आहे का हे ही पाहाणं महत्त्वाचं आहे.

'न्यूज 18 लोकमत' या रिसर्चची कोणतीही पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणतेही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

VIDEO : आदित्य ठाकरे लालबाग राजाच्या चरणी

Published by: Kranti Kanetkar
First published: September 10, 2019, 8:17 AM IST
Tags: lifestyle

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading