निमयित एक सफरचंद खा, 'हे' गंभीर आजार दूर ठेवा

निमयित एक सफरचंद खा, 'हे' गंभीर आजार दूर ठेवा

आपल्या आहारात तुम्ही केवळ एका सफरचंदाचा समावेश केल्यास तुम्हाला कधीही डॉक्टरकडे जावं लागणार नाही, असं म्हटलं जातं.

  • Share this:

आपल्या आहारात तुम्ही केवळ एका सफरचंदाचा समावेश केल्यास तुम्हाला कधीही डॉक्टरकडे जावं लागणार नाही, असं म्हटलं जातं. सफरचंद हे एक असं फळ आहे, ज्याच्या सेवनानं शरीरास पोषक असलेली सर्वच तत्त्वं आपल्याला मिळतात. निरोगी आरोग्यासाठी दररोज सकाळी एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. यामुळे कित्येक गंभीर आजारांपासून आपला बचाव होण्यास मदत होते.

सफरचंदाच्या सेवनामुळे अल्झायमर, कॅन्सर आणि ट्युमरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. या फळात असणाऱ्या फायबरमुळे आपलं पोट स्वच्छ राहण्यास मदत होते. शिवाय, हृदय आणि स्नायूंच्या समस्यांपासून तुमची सुटका होते.

(वाचा :ऑफिसमध्ये तुम्ही सहकाऱ्यांसोबत जेवता का? जाणून घ्या हे मोठे फायदे)

सफरचंद खाण्याचे फायदे

अल्झायमरचा धोका कमी होतो :

अल्झायमरच्या आजारात रुग्णाच्या स्मरणशक्ती कमी-कमी होत जाते. विसराळूपणा ही एक गंभीर समस्या निर्माण होऊ लागते. यामध्ये रुग्ण आपल्या नातेवाईकांनाही योग्यरितीनं ओळखू शकत नाही. या आजाराची लक्षणं जाणवू लागल्यास सफरचंदाचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरले. यामुळे मेंदूला पोषकतत्त्वं मिळतात.

(वाचा :WhatsApp आणतंय नवं भन्नाट फीचर, या ऑप्शनमुळे तुमच्या फोनमधली वाचणार मेमरी)

स्वादुपिंडाचा कर्करोग :

अमेरिकेतील कॅन्सर रिसर्चच्या संशोधकांनुसार, नियमित सकाळी नाश्त्यामध्ये रोज एक सफरचंद खाल्ल्यास स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका जवळपास 23 टक्के कमी होतो. यामध्ये ट्युमर होण्याची शक्यताही कमी होती.

(वाचा :सावधान! तुमच्या 'या' 3 गोष्टींमुळे जोडीदार जाऊ शकतो दूर)

मधुमेह नियंत्रित येतं :

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा व्यक्तींना सफरचंदाचं सेवन करणं फायदेशीर ठरते. सफरचंदातील पोषक तत्त्वांमुळे रक्तातील शर्करा नियंत्रित येते.

वजन घटण्यास मदत :

ज्यांना खरंच आपलं वाढलेलं वजन नियंत्रणात आणायचं असेल तर त्यांनी सफरचंद खाण्यास सुरुवात करावी. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

SPECIAL REPORT : कंगनाची नौटंकी सुरूच, आता पत्रकारांना दिलं थेट चॅलेंज

First published: July 12, 2019, 6:25 AM IST

ताज्या बातम्या