Elec-widget

'हे' 5 पदार्थ तुमचं नैराश्य कमी करण्यास करतील मदत!

'हे' 5 पदार्थ तुमचं नैराश्य कमी करण्यास करतील मदत!

तुमच्या खाण्या पिण्य़ाच्या सवयींचाही नैराश्यामध्ये वाटा असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांची माहिती देणार आहोत ज्याने तुमचं नैराश्य कमी होण्यास मदत होईल.

  • Share this:

मुंबई, 20 जुलै : धकाधकीच्या या जीवनात प्रत्येक जण ताण तणाव घेऊन वावरत असतो. जीवनात येणाऱ्या चढ-उतारांमुळे काही वेळा नैराश्य येतंच. नैराश्य येण्याची अनेक कारणं असू शकतात. ऑफिसचा तणाव, काही चांगले- वाईट अनुभव यांमुळे अनेकंाना नैराश्याला सामोरं जाव लागतं. शिवाय आजच्या शर्यतीच्या जगामध्ये नैराश्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होताना दिसतो आणि त्यासोबत जुळवून घेणे कठीण होते. तुमच्या खाण्या-पिण्य़ाच्या सवयींचाही यामध्ये वाटा असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांची माहिती देणार आहोत ज्याने तुमचं नैराश्य कमी होण्यास मदत होईल.

तुम्हाला नूडल्स आवडतात का? अति नूडल्स खाणं पडेल महागात

अंडी

अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी अंडी खाण्याची आवश्यकता आहे. अंड्यांमध्ये ऊर्जा, प्रथिने, खनिजे, व्हिटॅमिन ए आणि डी भरपूर प्रमाणात आढळतं. त्याने तणाव कमी होण्यास मदत होते. ट्रायप्टोफान हे शरीरासाठी उपयुक्त आम्ल आहे. ते ‘सेरोटोनिन’ नावाचं रसायन शरीरात तयार करण्यास मदत करतं. ज्यामुळे तुमचा मूड, झोप आणि स्वभाव व्यवस्थित राहून नैराश्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

भोपळ्याच्या बिया

Loading...

भोपळ्याच्या बियांमध्ये लोहाची पुरेशी मात्रा असते. त्याने 'इलेक्ट्रोलाईट' नियंत्रीत राहण्यास मदत होते. इलेक्ट्रोलाईट म्हणजे द्रवात विरघळल्यावर ज्याचे आयरन विलग होतात असा पदार्थ. भोपळ्याच्या बिया खाल्याने रक्तदाबावरही नियंत्रण ठेवता येते. परिणामी, तणाव आणि नैराश्य, चिंता अशा समस्या कमी होतात.

डार्क चॉकलेट

फार कमी लोकांना डार्क चॉकलेट खायला आवडते. इतर चॉकलेटच्या तुलनेत हे चवीला कडवट असतं. मधूमेह आणि नैराश्य असणाऱ्या लोकांना हे चॉकलेट फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाल्ल्याने स्ट्रेस कमी होतो. तसेच मूड चांगला होण्यास मदत होते. डार्क चॉकलेट खाल्याने मूड नियंत्रीत करणारे Neurotransmitter तयार होण्यास मदत होते. Neurotransmitter हे शरीरात पसरत जाणारं, चेतातंतूच्या टोकाला तयार होणारं रसायन आहे. 70 टक्क्यांपेक्षा जास्त कोकोचं प्रमाण असणारं डार्क चॉकलेट खाणं फायदेशीर आहे.

प्रवासात चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, आरोग्याला आहेत धोकादायक

कॅमोमिला

कॅमोमिला एक सुगंधी वनस्पती असून ती लहान डेझीसारखीच दिसते. केमोमाइलचा सर्वात व्यापक वापर अनेकदा हर्बल चहाच्या स्वरूपात पाहायला मिळतो. तणाव निवारक म्हणून आणि निद्रानाश मदत करण्यासाठी कॅमोमिलाला वापर तुम्ही करु शकतो. जवळपास 8 आठवड्यांसाठी याते सेवन केल्याने तणाव आणि नैराश्यावर चांगले परिणाम दिसून येतील.

दही

नैराश्याचा सामना करत असाल तर, तुम्ही आहारात दह्याचा समावेश नक्की केला पाहिजे. दह्याचा वापर आहारात सातत्याने केल्याने मेंदूतील सकारात्मकता वाढवणाऱ्या पेशीमधील रासायनिक प्रक्रिया वाढीस लागून चिंता, नकारात्मक विचार आणि औदासिन्य कमी होऊन मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते. एका अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार सलग 4 आठवडे दिवसातून दोन वेळा दही खाल्याने मेंदूचं कार्य सुरळीत राहण्यास मदत होते.

या पदार्थांव्यतीरिक्त तुम्ही जास्तीत जास्त फळांचं सेवन करु शकता. मेंदूसाठी आणि मानसिक आरोन्यासाठी उपयुक्त असणाऱ्या केळं, ओट्स, सब्जाच्या बिया, बदाम या पदार्थांचं सेवनही करु शकता.

SPECIAL REPORT: फेसबुकवर FaceApp Challengeची धूम; काय आहे चॅलेंज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 06:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...