बॉडी 'डिटॉक्स' करण्यासाठी हे 8 उपाय करा, तुम्हालाही वाटेल फ्रेश

बॉडी 'डिटॉक्स' करण्यासाठी हे 8 उपाय करा, तुम्हालाही वाटेल फ्रेश

शरीत ताजं-तवाणं करण्यासाठी तुम्हाला तुमची लाइफस्टाइल पहिल्यांदा बदलावी लागेल. जीभेपेक्षा शरिराला काय गरज आहे ते लक्षात घ्या.

  • Share this:

मुंबई 30 ऑक्टोंबर : दिवाळीचा उत्सव आता संपलाय. दिवाळीत खमंग-गोड फराळ करून तुमचं पोट नक्कीच बिघडलं असणार. दिवाळीच्या आधी घरातली स्वच्छता केली जाते. तर सण झाल्यानंतर गरज असते ती शरीराच्या स्वच्छतेची. या काळात तेलकट, तुपकट इतर खाणं- पिणं आणि आवडत्या  पदार्थांवर मनसोक्त ताव मारणं सुरू असते. त्यामुळे शरीराला जडपणा येतो, थोडी सुस्तिही असते. ही स्तुस्ती घालवून पुन्हा नव्या जोमाने आणि उत्साहाने कामाला जाणं आवश्यक असतं. पण त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. सवयी बदलाव्या लागतील. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही पुन्हा ताजे तवाने होऊ शकता. याच प्रक्रियेला बॉडी डिटॉक्स करणं असंही म्हणतात. म्हणजेच तुमच्या शरीरात जे हानीकारक घटक साचले असतील ते शरीराबाहेर टाकणं गरजेचं असतं. त्यासाठी जुन्या सवयी बदलून तुम्हाला काही नव्या गोष्टी कराव्या लागतील.

जाणून घ्या दररोज बदाम खाल्ले तर शरीरावर त्याचा असा होतो परिणाम

लिंबू पानी

सकाळी दिवसाची सुरुवात तुम्ही लिंबू पानी पिऊन करू शकता. सकाळी फ्रेश झाल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा अर्धा चमचा रस घालून ते पाणी प्या. गरज वाटलीच तर त्यात अर्धा चमचा मधही तुम्ही मिसळू शकता.

गोड पदार्थ अजिबात खाऊ नका. काही दिवस तुमच्या जेवणातून साखर आणि गोड पदार्थ पूर्ण वर्ज्य करा. साखर, सॉफ्ट ड्रिंक्‍स, आइसक्रीम, चॉकलेट खाणं टाळा. खायचंच असेल तर लो शुगर असलेले पदार्थ खा.

हिरव्या पालेभाज्या

ताजं तवाणं राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांची जास्त गरज असते. निरोगी राहण्याशिवाय या भाज्या तुम्हाला मोठी ऊर्जा देत असते. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी या गोष्टींची गरज आहे.

भरपूर पाणी प्या

शरीराला पाण्याची जास्त गरज असते. त्यामुळे किमान 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. पाण्यात तुम्ही लिंबू, काकडी, पुदीनाही टाकू शकता. नारळ पाणी पिणंही खूप फायद्याचं आहे. त्यामुळे विषारी घटक शरीरातून बाहेर टाकले जातात.

मुलांमध्ये हे बदल दिसले तर त्यांनी लगेच लग्न करण्याचा घ्यावा निर्णय

सलाडचा जेवणात समावेश करा

जेवणात सलाडचा भरपूर समावेश करा. गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो यांचा समावेश असू द्या.

प्रोटीनचा समावेश करा

जेवणात इतर गोष्टींशिवाय प्रोटीन राहिल याची काळजी घ्या. मासे, अंडी, पनीर, हिरव्या भाज्यांमधून जास्त प्रमाणात प्रोटीन मिळतं.

हेल्दी ऑईलचा वापर

जेवणात इतर कुठल्याही ऑईलचा वापर न करता कमी फॅट्स असणाऱ्या तेलाचा वापर करा. कच्च्या घाण्यांचं तेल वापरण्यासाही हरकत नाही. शुद्ध तुपाचाही वापर करू शकता.

जंक फुड टाळा

केवळ जीभेला चांगलं लागतं म्हणून हॉटेलमधलं खाणं टाळा. केक, चिप्स, बिस्किट, सॉफ्ट ड्रिंक्स हे शरीरासाठी अतिशय हानीकारक असतं. त्याचा वापर पूर्णपणे बंद करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2019 09:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading