तुम्ही तुमच्या जोडीदाराला हवी तशी स्पेस देता का?

जोडीदार निवडताना व्यक्तिस्वातंत्र्य मिळेल की नाही, याचा विचार केला जातो

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 08:14 PM IST

तुम्ही तुमच्या जोडीदाराला हवी तशी स्पेस देता का?

मुंबई, 18 जून - पूर्वी आपल्या पाल्यासाठी जोडीदाराची निवड आईवडीलच करायचे. लग्न करणाऱ्या वधू-वरांना आपला जोडीदार आपल्यासाठी योग्य आहे की नाही याबाबतीत विचार करायला संधीच दिली जात नव्हती. आज मात्र परिस्थिती बददली आहे. लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे जोडीदाराची निवडही आजची पिढी स्वतः करते. त्यामुळे दोडीदारासाठी पुरेसा वेळ देणं अपेक्षित असतं. आजच्या पिढीच्या जोडीदाराबद्दलच्या बदललेल्या अपेक्षा खूप वेगळ्या आहेत. आजच्या पिढीला त्यांची स्वतःची स्पेस हवी असते.

जोडीदार निवडताना व्यक्तिस्वातंत्र्य मिळेल की नाही, याचा विचार केला जातो. पालकही आता याबाबतीत सहमत असतात. आताच्या पिढीला आपला जोडीदार हा सर्वांपेक्षा काहीतरी वेगळा असावा असंही वाटतं. आताची पिढी आधुनिक तर आहेच परंतु खूप प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे तिला किंवा त्याला ती किंवा तो आयुष्यभर संसार करण्यासाठी फिट नसेल तर ते प्रेम असूनही लग्नाचा निर्णय घेताना मात्र विचार करतात. जोडीदार निवडताना त्यांचा स्वभआव किंवा दृष्टीकोन यासोबतच आर्थिक स्तर आणि कुटुंबपद्धतीचाही आजची पिढी विचार करते.

तुमचं कशातच लक्ष लागत नसेल, तर मनःशांती मिळविण्यासाठी करा 'हे' उपाय

आज मुलीसुद्धा शिक्षित आणि कमावत्या झाल्याने त्यांच्या जोडीदाराबद्दल असलेल्या अपेक्षासुद्धा बदलेल्या आहेत. पूर्वी जोडीदार निवडीसाठी मुलाची आणि मुलींची मते विचारात घेतली जात नसत, परंतु आता तसं काही राहिलेलं नाही. मुलं आणि मुली लग्नाआधी एकमेकांना भेटून, एकमेकांचे विचार जुळतात का ते बघतात, आयुष्यात सोबत राहण्यासाठी एकमेकांसाठी योग्य आहोत का, ते बघतात आणि मगच लग्नाला होकार देतात.

पालक म्हणून तुम्ही आपल्या मुलांसोबत असं तर वागता नाही ना? करू नका 'या' चूका

Loading...

आपल्याला हवा असणारा जोडीदार हा आपला मित्र किंवा मैत्रिणीमध्येच मिळत असेल तर त्यात वाईट काय आहे? एका अर्थाने लग्नाच्या बाबतीत आजची तरुण पिढी स्वावलंबी झाली आहे, असे म्हणता येईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Jun 18, 2019 08:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...