घरातील कोपऱ्यांकडे करू नका दुर्लक्ष; सजवटीसाठी उपयुक्त आहेत 'या' 8 टिप्स

घरातील कोपऱ्यांच्या सजावटीकडे तुम्ही लक्ष दिलं, तर घरात प्रसन्न वातावरणाची अनुभूती येते

News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 09:03 PM IST

घरातील कोपऱ्यांकडे करू नका दुर्लक्ष; सजवटीसाठी उपयुक्त आहेत 'या' 8 टिप्स

मुंबई, 21 जून - अनेकजण घरातल्या कोपऱ्यांकडे दुर्लक्षच करतात. त्यानंतर काही दिवसानंतर धूळ आणि जळमटं जमा होतात आणि घर भकास दिसायला लागतं. जर घरातील कोपऱ्यांच्या सजावटीकडे तुम्ही विशेष लक्ष दिलं, तर घरात प्रसन्न वातावरणाची अनुभूती येते. घरातला प्रत्येक कोपरा सजविण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा काही टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1 - दिवाणखान्याची शोभा वाढविण्यासाठी तिथल्या कोपऱ्यांच्या सजावटीचा गांभीर्याने विचार करायला हवा. थोडी कल्पनाशक्ती वापरली तर कोपऱ्यांना अधिक कलात्म पद्धतीने तुम्ही सजवू शकता.

2 - अनेकदा घर सजवताना कोपऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. पण थोडीशी अधित मेहनत घेऊन कोपऱ्यांना घरातली सगळ्यात सुंदर जागा तुम्ही बनवू शकता.

बेडशीट खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी

3 - रुमची प्रोफाइल तुम्ही कोपऱ्याचा कसा उपयोग करता यावर अवलंबून असते. कोपऱ्याची जागा लहान असेल तर त्याजागी आरसे लाून ती जागा आणखी मोहक बनविता येईल.

Loading...

4 - कोपऱ्याची जागा भरायची म्हणून तिकडे मुद्दाम काहीतरी करू नका. त्यामुळे तो घराचा एक कोपरा आहे हे स्पष्ट दिसून पडतं. घराचा एक भाग नसून तो वेगळा आहे असं सारखं जाणवत राहतं.

5 - जेव्हा तुमच्याकडे मोठी जागा असेल आणि ती तुम्हाला घराच्या इतर भागापेक्षा थोडी वेगळी दाखवायची असेल तेव्हा तुम्ही तो भाग उठावदार करु शकता. पण तो तसा करताना हे लक्षात ठेवा की त्यात नावीन्य असणं गरजेचं आहे. तोचतोपणा टाळा.

डोक्यावरचं टेंशन तुम्हाला दूर करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी कराच

6 - दिवाणखाना ही अशी जागा आहे जिकडे तुम्ही पाहुण्यांचं स्वगत करता. त्यामुळे लिव्हिंग रूम कलात्मक पद्धतीने सजविण्याकडे जास्त लक्ष द्या. कॉनर्सची जागा आणि घराची एकूण सजावट यांचा योग्य मेळ बसवणं आवश्यक असतं.

7 - क्लासिक डिझाइन करताना तुम्ही वॉल म्युरल्स पेन्ट करून तसंच विविध कलाकुसरीने ती भिंत रंगवू शकता. अशा कोपऱ्यात दिवा लावूनसुद्धा तुम्हाला उत्तम परिणाम साधता येईल. लाकडी किंवा धातूच्या वस्तूंचासुद्धा तुम्हाला वापर करता येईल.

8 - दिवाणखान्यातल्या एका कोपऱ्यात छोटा धबधबा, एखादी मूर्ती किंवा सुंदर रोपटंही ठेवता येईल. कोपऱ्यात टेबल असेल तर त्यावर एखादी मूर्ती ठेवून त्याला साजेशी प्रकाशयोजना करून तो भाग तुम्हाला सुशोभित करता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Jun 21, 2019 09:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...