मनालीला फिरायला गेल्यानंतर अजिबात मिस करू नका 'हे' अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स

या हिल स्टेशनवर अशी अनेक ठिकाणं आहेत, जीथे तुम्हाला स्पोर्ट्स अ‍ॅडवेंचरचा थरारक अनुभव घेता येईल.

  • Share this:

देशातील्या पर्यटन स्थळांपैकीच कुल्लू-मनाली हे सर्वांत लोकप्रिय आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या हिल स्टेशनला भेट देतात आणि इथला निसर्गाचा नजाराणा पाहून हरखून जातात. या हिल स्टेशनवर अशी अनेक ठिकाणं आहेत, जीथे तुम्हाला स्पोर्ट्स अ‍ॅडवेंचरचा थरारक अनुभव घेता येईल. जर तुम्ही मनालीला जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर याठिकाणी गेल्यानंतर हे अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स अजिबात मिस करू नका.

पॅराग्लायडिंग - या डेस्टिनेशनला येणाऱ्या पर्यटकांच्या यादीत पॅराग्लायडिंग हे प्रथम क्रमांकावर असतं. पक्षांसारखं उडणं ही एक रोमांचक कल्पना असली तरी, तुमची ही इच्छा इथल्या इथल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये पूर्ण होऊ शकते.

रिव्हर राफ्टिंग - इथल्या सगळ्यात थ्रिलिंग ऐक्टिव्हिटीज पैकी एक म्हणजे रिव्हर राफ्टिंग. मनालीत रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घ्याचा असेल तर उन्हाळा बेस्ट आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांवर वितळणाऱ्या बर्फामुळे इथली व्यास नदी दुथडी भरून वाहते. पावसाळ्यात या नदीचं रौद्ररूप तुम्हाला पहायला मिळेल. म्हणून पावसाळ्यात रिव्हर राफ्टिंग करणं जास्त धोकादायक ठरू शकतं.

स्किइंग - भारतातलेच नव्हे तर इतर अनेक देशातले पर्यटक इथे स्किइंगाचा थरार अनुभवण्यासाठी येतात. हा अनुभव घेण्यासाठी येणाऱ्या नव्या आणि अनुभवी पर्यटकांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या पर्यटकांना विशेषज्ञांच्या देखरेखीतच स्कीइंग करता येतं.

रिव्हर क्रॉसिंग - बोटिंग करण्याचा आनंद तर तुम्ही नक्कीच घेतला असेल. होऊ शकतं तुम्हाला पोहण्याचीसुद्धा आवड असेल. पण इथे दोरीच्या सहाय्याने दुथडी भरून वाहणारी नदी क्रॉस करण्याचं थ्रिल अनुभवता येतं. ज्यालाच रिव्हर क्रॉसिंग असं म्हटलं जातं. असं अ‍ॅडव्हेंचर जर तुम्ही मिस केलं तर तुमची मनाली ट्रिप अर्धवट राहू शकते.

First published: June 14, 2019, 8:06 PM IST
Tags: manali

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading