पॉकेटमनी कसा खर्च करायचा हे मुलांना अनुभवातून शिकू द्या

यामुळे मुलांना बचतीचं महत्त्व तर कळतंच, शिवाय आपली आर्थिक फसवणूक होणार नाही यासाठी ते सावध राहतात

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 07:06 PM IST

पॉकेटमनी कसा खर्च करायचा हे मुलांना अनुभवातून शिकू द्या

मुंबई, 18 जून - मुलं दहा-बारा वर्षींची झाली की आई-बाबांकडे पॉकिटमनीसाठी हट्ट करतात. मुलांच्या आर्थिक गरजा पूर्ण करताना पालकांनी वेळ साधून त्यांना व्यवहारज्ञानाचं बाळकडू पाजायला हवं. उत्तम व्यवहारज्ञान मिळाल्यामुळे मुलांना बचतीचं महत्त्व तर कळतंच, शिवाय आपली आर्थिक फसवणूक होणार नाही यासाठी ते नेहमी सतर्क राहतात.

मुले तशी हुशारच असतात. फक्त त्यांना योग्यवेळी आणि योग्य पद्धतीने माहिती दिली तर ती त्यांच्या चटकन लक्षात राहते. पालकांनीसुद्धा त्यांच्यावर सतत सूचनांचा मारा न करता, त्यांना अनुभवातून व्यवहारज्ञान शिकू द्यावं. सुटीच्या दिवशी त्यांना पैसे देऊन एखादी वस्तू विकत आणायला सांगावी. ती वस्तू मिरच्या, कोथिंबिर असेल किंवा ब्रेड-खारी अशा स्वरूपाची असू शकते.

चष्मा सोडवायचा आहे? मग घरच्याघरी करा 'हे' सोपे उपाय

वह्या, पुस्तके आणि कंपास असं साहित्य मुलं स्वतः खरेदी करतील यावर भर द्यावा. मात्र, मुलं ही खरेदी कशी करतात यावर लक्ष ठेवावं. त्यांनी दिलेले सुटे पैसे त्यांच्याचकडून मोजून घ्यावे. संबंधित वस्तूचे भाव दोन-तीन ठिकाणी विचारले का याची चौकशी करावी. पालकांसोबतच्या हेल्दी संवादातून मुलं आर्थिव व्यवहार शिकत जातात.

पालकांनी मुलांना पॉकेटमनी जरूर द्यावा. यामुळे त्यांना पैशाची हाताळणी कशी करायची याचे उत्तम धडे मिळतात. महिन्याला द्यावयाची पॉकेटमनीची रक्कम मुलांशी बोलूनच नक्की करावी. त्यांच्या मित्रांना किती पॉकेटमनी मिळतो याचीही माहिती त्यांच्याकडूनच काढून घ्यावी. हे करत असताना आई आणि वडिलांनी मुलांशी चांगला संवाद साधावा. तसंच दिलेला पॉकेटमनी मुलं कसा खर्च करतात यावरसुद्धा लक्ष ठेवावं. मुलं पॉकेटमनी वाढवून मागत असतील तर पालकांनी तो सरजासहजी वाढवून देऊ नये. त्यांचा गरजा लक्षात घेऊनच तो वाढवावा.

मुलगा किंवा मुलगी पॉकेटमनी कसा खर्च करतात यावर पालकांनी बारकाईनं लक्ष ठेवावं. सुरुवातील त्यांना आठवड्याभरासाठी पैसे द्यावे. यातून कमी पैशात आपल्या गरजा कशा भागवायच्या याचा धडा त्यांना मिळेल. त्यानंरी त्यांच्यावर विश्वास ठेऊन महिन्याभरासाठी पैसे द्यावेत. हातात पैसे पडतात मुलं कोणकोणत्या गोष्टींवर खर्च करतात याचं निरिक्षण करावं. यातून त्यांचा स्वभाव पालकांना समजू शकतो.

योग्यवेळी 'नाही' म्हणण्याचं धाडस तुम्ही दाखवायलाच हवं

स्वतःचे बजेट आखून त्याप्रमाणे खर्च करण्याची सवय लहानपणापासून लागणे हे केव्हीही उत्तम. मुलांकडून अनावश्यक कारणांसीठी खर्च झाला असेल तर त्यांच्यावर चिडचिड करू नये, त्यांना रागावू नये. त्यांच्याशी गप्पा मारत अनावश्यक खर्चामुळे होणारे नुकसान त्यांना समजावून सांगावे. पॉकेटमनीतून त्यांनी काही पैशांची बचत केली असेल तर त्यांच कौतुक करायला अजिबात विसरू नये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2019 07:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close