जीवनशैलीत फक्त हे 10 बदल; कोरोना काळात महिलांना निरोगी ठेवण्यासाठी करतील मदत

जीवनशैलीत फक्त हे 10 बदल; कोरोना काळात महिलांना निरोगी ठेवण्यासाठी करतील मदत

कोरोनाच्या या परिस्थितीत ऑफिस आणि घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे जरुरी आहे.

  • Last Updated: Jul 16, 2020 03:43 PM IST
  • Share this:

कोविड-19 च्या साथीने सगळ्यांचीच दिनचर्या बदलली आहे. सगळेच जण एकीकडे दिनक्रम सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असताना काही जण मात्र कुटुंब आणि कामकाज यांच्या गडबडीत आपली गाडी रुळावर आणायचा प्रयत्न करत आहेत. तर काही जण आरोग्य सांभाळण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे जरुरी आहे. महिलांनी आपले मन आणि आरोग्य कसे सांभाळावे याविषयी काही माहिती आम्ही इथे देत आहोत.

1. पुरेशी झोप आणि पाणी प्यावे : पुरेसे पाणी प्यावे आणि 8 तास झोप घेणे गरजेचे आहे. याने शरीर आणि मन दोघेही निरोगी राहतील.

2. योग आणि ध्यान : रोजच्या धकाधकीमध्ये स्वत:साठी वेळ काढणे कठीण काम आहे. तरीही अर्धातास वेळ काढला तरी खूप समस्या सुटतील. हा अर्धातास ध्यान आणि योग करण्यात व्यतीत करा त्यामुळे ऊर्जा वाढण्यासाठी मदत होईल.

3. स्क्रीन टाइम कमी करा : स्क्रीन टाइम हा एक महत्वाचा मुद्दा लॉकडाऊनच्या काळात पुढे आला आहे. स्क्रीन टाइम म्हणजेच मोबाइल आणि पाहण्यावर खर्च होणारा वेळ. स्क्रीन टाइम कमी करणे महिलांना तसे कठीण जाणार आहे. तरी दिवसातील किमान 20 मिनिटं तुम्ही मोबाईलपासून दूर राहून या वेळेत डोळ्यांच्या व्यायामासाठी दूरच्या वस्तूवर नजर एकाग्र करून पाहण्याचा प्रयत्न करा.

4. आपल्या शारीरिक मुद्रांविषयी जागरूक रहा : महिलांना अलीकडे चुकीच्या पद्धतीने बसण्याच्या सवयीमुळे स्लिप्ड डिस्क आणि सर्व्हाइकल स्पोंडिलीसिस हे आजार त्रास देतात. म्हणून बैठण्याच्या पद्धतीवर लक्ष द्या. आपल्या मानेच्या स्नायूंवरील ताण हलका करण्यासाठी काही मानेचे व्यायाम करा.

5. आहार : योग्य आहार अनेक प्रकारे मदत करतो. आपल्या आहारात तंतुमय पदार्थ, प्रथिने असायला हवेत सोबतच द्रव पदार्थ खाणे नेहमीच चांगले.

हे वाचा - जास्त गोड खाणंही एक व्यसन; अशी आहेत या व्यसनाची लक्षणं

6. मासिक पाळीत स्वच्छता राखा : मासिक पाळीतील स्वच्छता हा एक महत्वाचा घटक आहे. याकाळात येणारे अवघडलेपण खूप त्रासदायक असतो. जर महिलेने रोज स्नान केले नाही, सॅनिटरी नॅपकिन बदलले नाही तर ते आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. myupchar.com च्या डॉ. अर्चना निरुलां म्हणाला, "मासिकपाळीच्या काळात रोज काही तासांनी नॅपकीन बदलायला हवं. नॅपकिन खराब झालं नाही म्हणून ते बदलू नये असा विचार करू नका. एकच नॅपकिन खूप वेळ वापरल्याने संसर्ग होण्याची भीती असते.

7. साखर कमी खा : साखरेचे प्रमाण कमी करून गुळाचा उपयोग करा. त्याने हार्मोन नियंत्रणात ठेवायला मदत होते. मधुमेह, हृदय रोग, आणि लठ्ठपणा बळावण्याची शक्यता कमी होते.

8. थोडे उन्हात राहणे जरुरी : जास्त कडक उन्हात जाणे त्वचेसाठी चांगले नाही हे खरे आहे पण सूर्याचे ऊन हे व्यक्तीच्या समग्र विकासासाठी आवश्यक आहे. सूर्यप्रकाश ड जीवन्न्सात्वाचा महत्वाचा स्त्रोत आहे, त्याच्या शिवाय कॅल्शियम शरीरात शोषले जात नाही myupchar.com च्या डॉक्टर अनुराग शाही यांचे म्हणणे आहे कि ड जीवनसत्व युक्त पदार्थ खाण्याबरोबरच रोज 15 ते 20 मिनिटे उन्हात राहणे हा ड जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्याचा उत्तम उपाय आहे.

9. स्वतःसाठी थोडा वेळ काढा : घराच्या कामासाठी नाही पण स्वतः साठी थोडा मोकळा वेळ काढा. या वेळात आपल्या आवडी जोपासा , नवीन सवयी विकसित करा.

10. वाईट सवयींपासून दूर राहा : सिगारेट आणि धूम्रपान करणाऱ्यांपासून दूर रहा आणि स्वतः पण करू नका. दारू पित असाल तर अगदी कमी प्या.

हे वाचा - लॉकडाऊनमध्ये घरी असूनही तुमचा नवरा कामचोरी करतोय; आळशी पतीला असं लावा घरकामाला

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - महिलांचे आरोग्य

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 16, 2020, 3:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading