मुंबई, 16 जून - अनेक उद्योग व्यवसायातील रोजगाराची गरज ही नोकरी मागणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कित्येकपटीने जास्त आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक लोकं बेरोजगार असल्याचं दिसून येतं. त्यामागचं मुख्य कारण असंही आहे की, अनेक बेरोजगार समोर आलेल्या संधीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात तीचा अपमान करतात.
वास्तिवक पाहता कोणतंही काम हे कमी दर्जाचं नसतं. प्रत्येक कामात तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकेल अशी एक सुवर्णसंधी लपलेली असते. जर तुम्ही त्या संधीकडे डोळस नजरेनं पाहिलं, एक संधी म्हणून तुम्ही ती स्वीकारली, तर तुम्हाला यशाच्या शिखरावर जाण्यापासून कुणीच रोखू शकत नाही.
शिफ्टमध्ये काम करताना लक्षात घ्या 'हे' आरोग्याविषयीचे धोके
यशस्वी लोकं कधीच कोणत्या कामाला कमी लेखत नाहीत. ज्या कामाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे ते चोख आणि उत्तम प्रकारे कंसं पूर्ण करता येईल फक्त याचाच ते विचार करतात. त्यांचं संपूर्ण लक्ष भविष्यात निर्माण होणाऱ्या संधीकडेच असतं. ती मिळवियाची असेल तर हातात असलेल्या कामातच एक सुवर्णसंधी लपलेली आहे यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो.
रिझल्ट ओरिएन्टेड काम करणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत 'या' 7 गोष्टी
म्हणून प्रत्येकाने हे लक्षात ठेवणयाची गरज आहे की, कोणतंही काम कमी दर्जाचं किंवा कमी महत्त्वाचं नसतं. जगात असं कोणतंच क्षेत्र नही ज्यात तुम्ही प्रगती करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आवश्यक त्या स्किल्स आत्मसात करून घ्याव्या लागतील. कारण नोकरी देणाऱ्या कंपऩ्या संभाव्य उमेद्वारांना प्रत्येक कामाचा अनुभव आहे की नाही, तसंच त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव किती आहे या सगळ्या गोष्टी पाहात असल्यामुळे संभाव्य उमेद्वारांनी त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणे गरजेचं ठरतं.