Life In लोकल- तिचा दरवाज्यावरचा हात सुटला तिच्या हातातली छत्री पडली आणि

Life In लोकल- तिचा दरवाज्यावरचा हात सुटला तिच्या हातातली छत्री पडली आणि

life in local, mumbai local, सवयीप्रमाणे बोरिवलीच्या बायकांनी दरवाजा अडवणाऱ्या बायकांना धक्का देत आत ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यात एक कॉलेजला जाणारी मुलगीही होती. तिच्या हातात लांब छत्री होती आणि पाठीवर बॅग होती.

  • Share this:

मुंबई, 27 जून- बोरिवली- विरार लोकल मधली भांडणं तर सर्वश्रुत आहेत. याबद्दल फक्त मुंबईतच नाही तर मुंबई बाहेरील लोकांना याबद्दल माहीत आहे. मी कृतिका बिर्जे राहायला बोरिवलीत. ही भांडणं मी नेहमीच बघते. विरार- वसईच्या महिला जाणीवपूर्वक दरवाजा अडवून बसणार हे नेहमीचं झालं आहे. अगदी आत नाही म्हटलं तरी किमान पाच ते सहा महिला जाऊ शकत असतील तरी दोघांनाही जायला देणार नाही. यात त्या दिवशी जे घडलं ते तर खरच भयानक होतं. माणूसकी मेली की काय असाच प्रश्न मला पडला आणि त्याचं उत्तर हो असंच मिळालं.

त्याचं झालं असं की, बोरिवलीहून मला विरारला एका कामानिमित्त जायचं होतं. त्यासाठी मी प्लॅटफॉर्म ६ वर उभी होते. प्लॅटफॉर्म ७ वर विरार- वसईवरून चर्चगेटला जाणाऱ्या जलद लोकल जातात. त्या ट्रेनला सर्वसामान्यपणे नेहमीच गर्दी असते. पण याचा अर्थ त्यात बोरिवलीहून एकही महिला चढू शकत नाही असं होत नाही. पण नेहमीच जाणीवपूर्वक दरवाजा अडवला जातो आणि कोणी चढू शकणार नाही याची तयारी चांगलीच केली जाते. त्यातही कोणी चढलंच तर मग बोरिवलीहून ट्रेन नाहीये का.. चढू देऊ नका... दरवाजावरच लटकत राहू दे.. असे टोमणे ऐकू येतात. पण विरारला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी बोरिवली ट्रेनमध्ये चढताना त्यांचा स्वाभिमान कुठे जातो ते अजून पर्यंत कोणालाच कळलं नाही. बोरिवली ट्रेनला लागून असलेल्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरच्या ट्रेनमध्ये उड्या मारताना त्या बोरिवली ट्रेनमधून प्रवास करतात हे त्या अगदी सहज विसरतात.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

त्या दिवशीही असंच काहीसं झालं. विरारवरून ट्रेन आली आणि प्लॅटफॉर्म ७ वर थांबली. सवयीप्रमाणे बोरिवलीच्या बायकांनी दरवाजा अडवणाऱ्या बायकांना धक्का देत आत ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यात एक कॉलेजला जाणारी मुलगीही होती. तिच्या हातात लांब छत्री होती आणि पाठीवर बॅग होती. तिच्याकडे पाहिल्यावर ती कॉलेजला जाणारी मुलगीच वाटत होती. आतमधून लोक बोरिवलीच्या महिला गाडीत चढू नये यासाठी धक्का देत होते आणि तो धक्का तिला लागल्यामुळे तिच्या हातातली छत्री खाली पडली आणि एक चप्पलही पडली. ती मुलगी कधीही पडू शकत होती. ती आतल्या लोकांना धक्का न देण्याची विनंती करत होती. पण तिचं कोणीच ऐकलं नाही. शेवटी तिने एका मुलीला तिचा निसटता हात पकडण्याची विनंती केली. प्लॅटफॉर्मवरील इतर लोक तिला उतरायला सांगत होते. तीही उतरणार होती मात्र इतक्यात गाडी सुरू झाल्याने ती तशीच पुढे गेली. विनंती करूनही तिचा साधा हातही कोणी पकडत नव्हतं. लोक भांडण्यातच जास्त व्यग्र होते. ती ट्रेन निघून गेल्यावर मला एकच प्रश्न पडला तो म्हणजे अशा मानसिकतेला म्हणावं तरी काय...

हेही वाचा-

Life In लोकल- तिला पाहताच तो प्रेमात पडला आणि तिच्यासाठी तो तीच ट्रेन पकडू लागला

Life In लोकल-काळ्या- पांढऱ्या कपड्यांकडे पाहून पोरांनी दुसऱ्या दारातून उडी टाकली

Life In लोकल- फाटक्या कपड्याच्या बाईने पैशांची ती बॅग उचलली आणि...

Life In लोकल- ती मुलगी ट्रेनमध्ये आईसाठी भांडता भांडता बेशुद्ध पडली

Life In लोकल- जरा लवकर निघालो असतो तर...

Life In लोकल- बाबा आज तुमचा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे म्हणून...

Life In लोकल- त्या एका चहाच्या व्यसनामुळे ट्रेन चुकली आणि...

Life In लोकल- कोळीणीला पाहून त्या जोडप्याने नाक मुरडलं आणि तिने...

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...

Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

First published: June 28, 2019, 9:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading