Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

गाडी खच्चून भरली होती, पण उशीर झाल्याने ती पकडण्यावाचून माझ्याकडे काही पर्यायही नव्हता.

Madhura Nerurkar | News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 02:15 PM IST

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

मुंबई,२८ मार्च- गाडी खच्चून भरली होती, पण उशीर झाल्याने ती पकडण्यावाचून माझ्याकडे काही पर्यायही नव्हता. आत डब्यात घुसण्याचा विचार मी केव्हाच सोडून दिला होता. दरवाज्यातून कशीबशी आत जायला जागा मिळाली. अवघे पाच- सहा पाऊलं आत जाऊन उभा राहिलो.

स्लो ट्रेन असल्यामुळे साहजिकच प्रत्येक स्टेशनवर दोन माणसं उतरत होती आणि सहा चढत होती. प्रत्येकजण गर्दीला शिव्या देत त्याच गर्दीचा एक भाग झाला होता.माझ्यासाठीही हे काही नवीन नव्हतं. पण त्या दिवशी असं काही झालं की मी पुरता हादरलो. मी जय तुम्हाला माझ्यासोबत घडलेली लोकलमधली गोष्ट सांगणार आहे.

आतापर्यंत मुलीच्या डब्यात होणाऱ्या घटनांबद्दल बोललं जातं लिहिलं जातं पण पुरुषांच्या डब्यात काय होतं याबद्दल फारसं कोणी बोलत नाही. आज मी सांगणार आहे.

गच्च भरलेल्या त्या ट्रेनमध्ये मी थोडी हलायला तरी जागा मिळतेय का याचा विचार करत होतो, इतक्यात मला मागून कोणी तरी स्पर्श केला असं जाणवलं. एवढ्या गर्दीत मान हलवायलाही जागा नव्हती, त्यात पूर्ण मागे वळून पाहणं तर सोडाच. मी पहिल्यांदा दुर्लक्ष केलं. पण नंतर थोड्या वेळाने माझ्यासोबत तसाच प्रकार घडला. तेव्हा मी जोरात ओरडलो, 'ए, शिस्तीत उभं रहा ना... नाही तर ट्रेनमधून उतरा.' पण यावर अपेक्षेनुसार कोणी उत्तर दिलं नाही. दरम्यान, गाडीतली गर्दी थोडी कमी झाली आणि मी स्वतःला त्या जागेपासून दूर केलं.

मी अश्लील चाळे करणाऱ्या माणसाला शोधण्याचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना झोपलेल्याला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेतो त्याला जागं करता येत नाही. त्याचप्रमाणे सुसंस्कृतचा मुखवटा घालून असभ्य चाळे करणारे पकडता येत नाही. ट्रेनमधल्या प्रवाशांना अशाप्रकारे त्रास घ्यायची ही कसली विक्रृती हेच मला अजून कळलं नाही. अशा माणसांबद्दल बोलायचं तरी काय आणि कोणाकडे त्यांची गाऱ्हाणी गायची हाच मुळात प्रश्न आहे.

Loading...

- मधुरा नेरुरकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2019 08:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...