Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

मी शरद माने त्यांच्यापैकीच एक होतो. नेहमीप्रमाणे कुर्लावरून अंबरनाथला जाणारी ट्रेन पकडली. महिलांच्या डब्यात जसे काही अलिखीत नियम असतात तसेच काहीसे नियम पुरुषांच्या डब्यातही असतात.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल- मुंबई आणि ट्रेन हे एक वेगळंच रसायन आहे. दररोज लाखो लोक यातून प्रवास करत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असतात. यातून प्रवास करणारा प्रत्येकजण भविष्यातली स्वप्न पाहत असतो तर काही वर्तमानात चाललेल्या गोष्टींचा विचार करत असतात. मी शरद माने त्यांच्यापैकीच एक होतो. नेहमीप्रमाणे कुर्लावरून अंबरनाथला जाणारी ट्रेन पकडली. सुदैवाने मला बसायला जागाही मिळाली. महिलांच्या डब्यात जसे काही अलिखीत नियम असतात तसेच काहीसे नियम पुरुषांच्या डब्यातही असतात.

पुरुषांच्या डब्यात जर पहिलं कोणी उभं राहिलं असेल तर बसणाऱ्यापैकी जो कोणी उठतो तेव्हा त्याची जागा पहिल्या उभ्या राहिलेल्या व्यक्तीला मिळते. मग ती जागा खिडकीकडची असो किंवा फोर्थ सीट त्या जागी जाऊन बसतो. याबद्दल कोणाला काही सांगावं लागत नाही. मात्र त्यादिवशी याच्या उलटं घडलं. माझी फोर्थ सीटवर बसलो होतो. दुसऱ्या सीटवर बसलेला एक माणूस त्याचं स्टेशन आलं म्हणून उठला तेव्हा अगदी दोन स्टेशन आधीच चढलेल्या ग्रुपपैकी एक मुलगा जाऊन त्या सीटवर बसला. तेव्हा खूप वेळ तिथे उभ्या असलेल्या एका माणसाने त्याला उठायला सांगितलं. हे एक कारण भांडणं सुरू होण्यासाठी पुरेसं होतं.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Life In लोकल-  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तसंच यातली तुम्हाला सर्वात आवडलेली कथा कोणती याबद्दलही आवर्जुन आम्हाला सांगा.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

उभी असलेली व्यक्ती बसलेल्या मुलाला ट्रेनच्या नियमांचं ज्ञान द्यायला लागले. आपल्या मित्राला बोलतायेत हे पाहून त्याचे इतर मित्रही मध्ये पडले. आता एक विरुद्ध चार असं भांडण सुरू झालं. असं म्हणतात की, ज्याचं कोणी नसतं त्याचे ट्रेनमधले प्रवासी असतात. तो बरोबर असून एकटा पडलाय असं दिसल्यावर त्याच्यासाठी इतर लोक भांडायला आली. तो मुलगा किती चुकीचा आहे.. आजची पिढी किती वाया गेली आहे, हे सगळे डायलॉग त्या भांडणात वापरले गेले. त्यांच्यातली बाचाबाची संपत नाही हे पाहून त्या मुलांपैकी एक मुलगा म्हणाला की, तुम्हाला माहीत नाही माझे बाबा पोलिसमध्ये आहेत. आवाज वाढवू नका जास्त, जिथे सांगाल तिथे उतरून तुला मारीन. तुझ्या एरियात येऊन तुला मारेन. तुझ्यासाठी असली भांडणं नवीन असतील. माझा बाप अशी भांडणं रोज पाहतो. तुम्ही जिथे सांगाल तिथे मी येईन.

त्याची दादागिरी दोन- तीन मिनिटं चालली असेल नसेल तोच एक माणूस मोठ्या आवाजात ओरडला. त्याच्या ओऱडण्यामुळे अचानक साऱ्यांचं लक्ष त्याच्याकडेच गेलं. भांडणारा ग्रुपही दोन मिनिटं त्या माणसाकडे पाहत राहिला... तुझे बाबा पोलिसांत आहेत.. तर कोणत्या पोलिस स्थानकात आहेत ते जरा एकदा सांगचं.. असं तो म्हणाल्यावर सारेच गप्प झाले. मीही एक पोलीस आहे. मला पाहायचंच आहे की तुझे बाबा कुठे काम करतात. तुझ्यामुळे आमचं नाव खराब होतं.

त्याचा वाढलेला आवाज पाहून सर्व मुलं शांत झाली आणि मग तो मुलगा म्हणाला की, 'जाऊ द्या ना साहेब.. आपण मराठी माणसं यांच्यासाठी कुठे भांडायचं...' त्यांच्यातली ही बाचाबाची सुरू असताना मी मात्र फोर्थ सीटला बसून फक्त पाहत होतो. सीटवरून सुरू झालेलं भांडणं पोलिसांवरून वळसा घेत शेवटी मराठी माणूस विषयावर येऊन थांबलं होतं.

या संबंधीत आणखी बातम्या इथे वाचा-

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ऐन गर्दीत ते कपल पुरुषांच्या डब्यात चढलं आणि...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

First published: April 30, 2019, 10:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading