Life In लोकल- ती मुलगी ट्रेनमध्ये आईसाठी भांडता भांडता बेशुद्ध पडली

माझ्या आईला बसायला जागा देत नाहीत.. माणुसकी राहिली नाही.. तुमच्या आईसोबत असं झालं पाहिजे, मग तुम्हाला कळेल.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 11:36 AM IST

Life In लोकल- ती मुलगी ट्रेनमध्ये आईसाठी भांडता भांडता बेशुद्ध पडली

मुंबई, 05 जून- मुंबई लोकल महिलांचा डब्बा आणि भांडण याबद्दल साऱ्यांनाच कुतुहल असतं. दररोज महिला कशा काय भांडू शकतात असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातही कामाला जाण्याच्या वेळेत भांडणं होऊ शकतात, हे साऱ्यांना पटू शकतं. पण दुपारच्या वेळी किंवा ऐन गर्दीच्या वेळी विरुद्ध दिशेने प्रवास करताना लोकं का भांडतात हाच मला पडलेला प्रश्न आहे.

मी सायली नाखवा त्या दिवशी जे भांडण पाहिलं ते पाहून मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. मी एकदा कामानिमित्त बोरिवलीला जात होते. दादरला विरारला जाणारी फास्ट ट्रेन पकडली. माझ्यासोबत एक मुलगी आणि तिची आई चढली. ट्रेनमध्ये गर्दी नसली तरी बसायला जागा नव्हती. आरामात उभं राहून प्रवास होऊ शकत होता. ती मुलगी आईसाठी सीट विचारत होती. अनेकांनी आधीच क्लेम केल्यामुळे तिला आणि तिच्या आईला बसायला जागा नव्हती. किमान भाईंदरपर्यंत दोघींना उभं राहून जावं लागणार होतं. दरम्यान तिने एका मुलीला तिच्या आईला सीट द्यायला सांगितली. तिने सीट आधीच दुसऱ्या मुलीने क्लेम केल्याचं सांगितलं. ही एक गोष्ट महाभारत सुरू व्हायला पुरेशी होती.


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Loading...

Life In लोकल   ः  मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माझ्या आईला बसायला जागा देत नाहीत.. माणुसकी राहिली नाही.. तुमच्या आईसोबत असं झालं पाहिजे, मग तुम्हाला कळेल. लाज कशी वाटत नाही.. हे सर्व ती इतक्या जोरात बोलत होती की, अख्खा डब्बा तिच्याकडे रोखून पाहत होता. या सगळ्यात ती बसलेल्या मुलीशी भांडायला लागली की, एक म्हातारी बाई उभी असतानाही तू दुसऱ्या तरुण मुलीला बसायला का जागा दिलीस. आतापर्यंत शांत बसलेली ती मुलगीही मग तिच्याशी भांडायला लागली. या सगळ्या गदारोळात त्या मुलीची आई मात्र काहीच बोलत नव्हती.

डब्यातील अनेक महिला त्या आईला मुलीला गप्प करायला सांगत होत्या. पण त्या मुलीला काहीच बोलत नव्हत्या. नक्की कशासाठी ती मुलगी भांडतेय... नक्की कसला राग ती लोकांवर काढतेय.. आईच काही बोलत नाही तर मुलगी एवढी का भांडतेय असे अनेक प्रश्न जेवढे मला पडले होते तेवढेच प्रश्न इतर प्रवाशांनाही पडले होते. ती बेंबीच्या देठापासून ओरडून बसलेल्या बायकांना शिव्या देत होती अचानक तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली. शेवटी ज्या महिलांना ती शिव्या देत होती तेच तिच्या मदतीला धावून येत तिला पाणी पाजलं आणि तोंडात टाकायला गोळी दिली. आईसाठी जागा मिळावी म्हणून भांडणाऱ्या त्या मुलीला शेवटी फोर्थ सीटवर बसवण्याची वेळ आली होती. तिची आई मात्र तिच्या बाजूला एकही शब्द न बोलता फक्त उभी होती.

हेही वाचा-

Life In लोकल- जरा लवकर निघालो असतो तर...

Life In लोकल- बाबा आज तुमचा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे म्हणून...

Life In लोकल- त्या एका चहाच्या व्यसनामुळे ट्रेन चुकली आणि...

Life In लोकल- कोळीणीला पाहून त्या जोडप्याने नाक मुरडलं आणि तिने...

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- एकही शब्द न बोलता त्याने खिशातले पैसे काढून टीसीला दिले आणि....

Life In लोकल- बोरिवली ट्रेन असून पण विरार ट्रेनमध्ये कशी काय चढली... ढकलून द्या तिला...

Life In लोकल- तिला स्पर्श करता येत नाही म्हणून त्याने खाली बसून...

Life In लोकल- पोलिसांच्या ताब्यात दिलं तरीही त्यांनी आमच्याच समोर त्याला सोडलं...

Life In लोकल- ‘सोडा त्यांना नाही तर ते मरतील...’

Life In लोकल- ‘त्याचे कपडे बघ कसेत फर्स्ट क्लासचा वाटतो तरी का तो...’

Life In लोकल- कधी झुरळही न मारलेल्या त्याने सर्वांसमोर ट्रेनमध्ये त्याला मारलं...

Life In लोकल- हिजड्यानं पैसे मागितले आणि त्या दोन वर्षाच्या मुलीनं हातातले चणे दिले

Life In लोकल- 'तुला माहीत आहे का माझे बाबा पोलिसमध्ये आहेत...'

Life In लोकल- त्यांनी मला चुकीची ट्रेन सांगितली आणि माझी नोकरी गेली

Life In लोकल- त्या एका चिंधी बॉलने आयुष्याचं सार शिकवलं

Life In लोकल- अन् त्या आजोबांना शिवीगाळ करत महिलांनी डब्यातून खाली उतरवलं

Life In लोकल- रागात त्या बायकांनी ओढणीने तिचा गळाच आवळला

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

Life In लोकल- ‘तुझ्याकडे पाहायला तू काय आयटम आहेस का?’

Life In लोकल- जर कानातले विकणारा पुरूष लेडीज डब्यात चालतो तर चुकून चढलेला माणूस का नाही?

Life In लोकल- विरारच्या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करतात

Life In लोकल- ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात...

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life in लोकल- अन् चक्क चूक नसतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनेच प्रवाशाची माफी मागितली

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life In लोकल- जेन्ट्स डब्यात त्याने गर्दीचा फायदा उचलला आणि...

Life in लोकलः ...आणि रात्रीच्या ट्रेनमध्ये त्याने अश्लील चाळे केले

Life in लोकलः 'मला ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्याची सवय आहे. तुमचं काय जातंय...'

Life In लोकल : इथे मिळेल एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारण्याचं कसब

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : सुख म्हणजे फोर्थ सीट...

Life In लोकल : मीडिया प्रोफेशल रोशन मुल्ला जेव्हा रोज ट्रेनमध्ये गिटार वाजवतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2019 11:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...