श्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध

श्वसनसंबंधी समस्यांवर रामबाण आहे ज्येष्ठमध; कोरोना काळात उपयुक्त असं औषध

कोरोना काळात आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात ज्येष्ठमध (licorice) उपयुक्त ठरेल.

  • Last Updated: Sep 28, 2020 09:52 PM IST
  • Share this:

ज्येष्ठमध युरोप आणि आशियाच्या बर्‍याच प्रदेशांमध्ये आढळतं आणि विविध पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या गोड चवीसाठी वापरतात. ज्येष्ठमध श्वसनाच्या संक्रमणापासून बचाव करण्यापासून ते आरोग्याच्या अनेक समस्यांवर फायदेशीर आहे. myupchar.com चे डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणतात की, ज्येष्ठमध हे जीवनसत्व बी आणि जीवनसत्त्व ई चा चांगला स्रोत आहे. तसंच यात पुरेशा प्रमाणात, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सेलेनियम, कॅल्शियम आणि जस्त सारखी खनिजं आहेत. यात बरेच आवश्यक फाईटोन्यूट्रिएंट्सदेखील आढळतात. ज्येष्ठमधाचे मूळ बाजारातही सहज सापडतं. हे मूळ पावडर किंवा कॅप्सूलच्या रूपातही मिळतं.

श्वसनप्रणालीच्या संसर्गाशी लढा देतं

जर तुम्हाला घशाची खवखव सतावत असेल किंवा सर्दी, खोकला अथवा दमा असेल तर श्वसनमार्गाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी ज्येष्ठमध खूप फायदेशीर आहे. यामुळे ब्रोन्कियल ट्युबची जळजळ कमी होते आणि वायुमार्ग शांत होतो कारण त्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. तसंच श्वसन रोग आणि श्लेषमातील जंतूशी लढण्यास देखील मदत करतं.

पचनप्रणालीत सुधार

ज्येष्ठमध पचन सुधारण्यासाठी एक उत्कृष्ट औषधी वनस्पती आहे. पोट फुगणं, सूज येणं आणि पोटातली अस्वस्थता कमी करतं. यामुळे भूक वाढवते, अपचनाची समस्या कमी होते आणि शरीरातील पोषक तत्वांचं शोषण करण्यास प्रोत्साहन मिळतं. ज्येष्ठमधातील कार्बेनेक्सोलोन आणि ग्लाइसीर्रिजिन सौम्य रेचक म्हणून कार्य करतात आणि पोटातील समस्यांपासून त्वरित आराम देतात.

यकृताच्या उपचारामध्ये उपयुक्त

ज्येष्ठमधातील अँटिऑक्सिडंट यकृताचं फ्री रेडिकल्स आणि विषारी घटकांमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करतात. हे हेपेटायटीस, चरबीयुक्त यकृत, कावीळ यासारख्या आजारांवर उपचार करण्यास मदत करतं. यकृताच्या फायद्यासाठी ज्येष्ठमध घालून चहा तयार करा आणि त्याचं सेवन करा.

संधिवातापासून आराम

myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. के एम नाधीर यांनी सांगितलं,सांधेदुखी, ताठरपणा आणि सूज ही संधिवाताची मुख्य लक्षणं आहेत. संधिवाताच्या उपचारात ज्येष्ठमध उपयुक्त आहे. संधिशोथासारख्या सूज दाहक रोगांच्या उपचारांमध्ये ज्येष्ठमध वापरलं जातं. ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्याने सूज आणि वेदना कमी होतात.

प्रतिकारशक्ती मजबूत होते

आयुर्वेदिक औषधी वनस्पती शरीराची सामान्य क्षमता (सामर्थ्य) आणि ऊर्जा पातळी सुधारण्यासाठी लाभदायक आहे. ज्येष्ठमधातील जैव-सक्रिय घटक सामान्य दुर्बलता, अशक्तपणा आणि थकवा कमी करतात आणि शरीराची चेतना सुधारतात. ज्येष्ठमधातली अँटी-मायक्रोबियल गुणधर्म रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात आणि शरीराचे विविध सूक्ष्मजीवाणूंच्या संक्रमणापासून संरक्षण करतात.

अल्सरमध्ये फायदेशीर

अल्सिरेटिव्ह कोलायटिस, अल्सर, चिघळलेली जखम किंवा तोंडाचा अल्सर इत्यादींच्या उपचारांमध्ये ज्येष्ठमधाच्या पावडरमधील दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे त्याला खूप महत्त्व आहे. त्यामध्ये उपस्थित बायोअॅक्टिव्ह कंपाऊंड कार्बेनॉक्सोलोन, तोंड आणि जठरासंबंधी अल्सरच्या उपचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे सूज कमी करण्यात आणि अल्सरचा धोका कमी करण्यास देखील मदत करतं.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - घरघुती उपाय

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 28, 2020, 9:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading