अंगावरून पांढरं पाणी जातंय; 5 घरगुती उपायांनी मिळवा आराम

अंगावरून पांढरं पाणी जातंय; 5 घरगुती उपायांनी मिळवा आराम

अंगावरून पाणी जाणं ज्याला व्हाइट डिस्चार्ज म्हटलं जातं (white discharge) यामुळे कित्येक महिला त्रस्त आहेत.

  • Last Updated: Nov 27, 2020 11:38 PM IST
  • Share this:

ल्युकोरियाला पांढर्‍या स्त्रावाची (ै समस्या म्हणून ओळखलं जाते. महिलांमध्ये ही समस्या उद्भवते. ही कोणत्याही वयात उद्भवू शकते. ल्युकोरियाच्या समस्येमध्ये मूत्रमार्गामधून एक चिकट पांढरा स्त्राव होतो ज्याचा वासही येतो. जर थोडासा पांढरा स्त्राव असेल तर ठिक आहे, मात्र भरपूर दिवस भरपूर प्रमाणात असा स्राव होत असेल तर ही चिंताजनक बाब असू शकते. यासाठी डॉक्टरांमार्फत तपासणी होणे आवश्यक आहे.

myupchar.com शी संबंधित डॉ. विशाल मकवाना यांच्या मते, ल्युकोरिया आजाराची अनेक कारणं असू शकतात. स्त्रिया त्यांच्या अंतर्गत जागेच्या स्वच्छतेची काळजी घेत नाही किंवा मूत्रमार्गाचा संसर्ग देखील याासठी कारणीभूत ठरू शकतात. याव्यतिरिक्त वारंवार यौन संबंध किंवा गर्भपात झाल्यामुळेही हा त्रास होऊ शकतो.

ल्युकोरियाची समस्या असलेल्या स्त्रियांना पांढर्‍या स्त्रावबरोबरच इतर लक्षणंही जाणवू शकतात. या लक्षणांमध्ये थकल्यासारखं वाटणं, मूत्रमार्गाच्या भागात खाज सुटणं, चक्कर येणं, डोकेदुखी किंवा बद्धकोष्ठता इत्यादींचा समावेश असू शकतो.

गुलाबाच्या पाकळ्या वापरून बनवा औषध

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या मते, जेव्हा पांढर्‍या स्त्रावाचा रोग होतो तेव्हा गुलाबाची पानं एक चांगले औषध म्हणून काम करते. गुलाबाची पानं सुकवून त्याची पावडर तयार करा. आता या पावडरला दररोज गरम दुधामध्ये मिसळून प्या. आठवडाभरात पांढर्‍या स्त्रावाचा त्रास दूर होईल.

नियमितपणे दूध आणि केळी यांचं सेवन करा

ल्युकोरियामध्ये केळी ही खूप उपयुक्त आहेत. पांढर्‍या पाण्याच्या स्त्रावाची समस्या असल्यास एक ग्लास दुधात अर्धा चमचा तूप आणि केळी कुस्करून मिसळून पिणं फायद्याचं आहे. ते नियमितपणे घेतल्यास पांढर्‍या पाण्याचा स्त्राव काही दिवसात प्रतिबंधित होईल. यासह शरीराचा थकवादेखील दूर होईल.

भेंडीचं पाणी

ऐकायला जरी हा एक अतिशय विचित्र तोडगा वाटला तरी ल्युकेरियाच्या समस्येमध्ये खूप फायदेशीर आहे. 100 ग्रॅम भेंडी आणि अर्धा लीटर पाणी घ्या. हे पाणी निम्मं होईपर्यंत पाण्यात भेंडी उकळा. पाणी थंड झाल्यावर त्यात थोडंसं मध मिसळून प्यावं. हा उपाय काही दिवसात समस्या दूर करेल.

आवळा पावडरनंदेखील कमी होईल ही समस्या

आवळा पावडरदेखील पांढर्‍या स्त्रावाच्या आजाराच्या समस्येवर एक अतिशय प्रभावी कृती आहे. आवळा पावडरमध्ये मध मिसळा आणि दिवसातून 2 वेळा घ्या. याचं नियमित सेवन केल्यानं पांढरा स्त्राव कमी होईल.

अंजीर आहे रामबाण औषध

पांढर्‍या पाण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी अंजीर फार उपयुक्त आहे. यासाठी 4 अंजीर चांगले धुवा आणि रात्री त्यांना भिजवा. सकाळी हे रिकाम्या पोटी खा. यानंतर पाणी प्या. हा उपाय नियमितपणं केल्यास एका महिन्यात पांढर्‍या पाण्याच्या स्त्रावाची समस्या दूर होईल.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - पांढरे पाणी: लक्षणे, कारणे, उपचार...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: November 27, 2020, 11:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading