फक्त थकवा आल्यावरच नाही तर हा महत्त्वाचा अवयव हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या लिंबूपाणी

फक्त थकवा आल्यावरच नाही तर हा महत्त्वाचा अवयव हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या लिंबूपाणी

लिंबूपाणी (lemon juice) पिण्याचे तसे बरेच फायदे आहेत. फक्त लिंबूपाणी बनवताना एक विशेष काळजी घ्या.

  • Last Updated: Oct 17, 2020 11:28 PM IST
  • Share this:

सहसा थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर आपण लिंबूपाणी (lemon juice) पितो. मात्र तुम्हाला माहिती आहे का नियमित लिंबू पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयवही हेल्दी राहतो आणि हा अवयव म्हणजे लिव्हर किंवा यकृत (liver). अन्न पचन आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे.  यकृत आहारामार्फत मिळालेली खनिजं, जीवनसत्त्वं, अँटीऑक्सिडंट्स हे सर्व पोषक घटक वेगळं करतं आणि शरीराच्या आवश्यकतेनुसार त्या अवयवांमध्ये पोहोचवते. यकृत शरीराची अनेक महत्त्वपूर्ण कार्ये पूर्ण करण्यात मदत करतं, म्हणून ते निरोगी राहणं खूप महत्त्वाचं आहे.

myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी म्हणाल्या, लठ्ठपणा, मधुमेह, मद्यपान, विशिष्ट रसायनं किंवा विषारी पदार्थ, असुरक्षित लैंगिक संबंध यकृत रोगाचा धोका वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. लिंबू यकृत स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतं. लिंबूमध्ये बरेच पोषक घटक असतात. फक्त जेवणातच नव्हे तर आयुर्वेद आणि पारंपारिक औषधांमध्येही लिंबूचा अनेक प्रकारे वापरल केला जातो. साइट्रस जातीतील लिंबू हे 'जीवनसत्त्व सी'चा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं लिंबामधले डी-लिमोनेन घटक यकृत स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. जीवनसत्त्व सी युक्त असल्याने लिंबू यकृतास पचन प्रक्रियेस मदत करण्यासाठी एन्जाइम तयार करतं.

हे वाचा - तुळस, कडूनिंबाप्रमाणेच आरोग्यदायी आहे पिंपळ; फायदे वाचाल तर थक्क व्हाल

यकृतासाठी नियमित लिंबूपाणी प्या. लिंबूपाण्यात साखरेऐवजी मध मिसळा. साखर वापरल्याने समस्या उद्भवू शकते. आयुर्वेदानुसार लिंबू पिण्यासाठी सकाळची वेळ चांगली आहे. सकाळी कोमट लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर जातात आणि पचन निरोगी होतं. लिंबाचा रस हा पोटातील पाचक रसांप्रमाणेच असतो. हे अन्नपचनासाठी आवश्यक असलेलं पित्त तयार करण्यासाठी मदत करतं.

लिंबाचा रस केवळ यकृत निरोगी ठेवण्यासच नव्हे तर त्वचा आणि नखं निरोगी ठेवण्यासाठी, पोट निरोगी ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यास देखील मदत करतं. लिंबू शरीरात आंबटपणा निर्माण करण्यापासून रोखतं. म्हणून पीएच पातळी सामान्य राहण्यासाठी या पेयाचं सेवन करणं चांगलं मानलं जातं.

हे वाचा - Homeopathy औषधं घेताय; तुम्ही अशी चूक तर करत नाहीत ना?

लिंबाचा रसाच्या व्यतिरिक्त बीट, हिरवं सफरचंद आणि गाजर रस देखील यकृतासाठी उत्तम आहे. तसंच हळद, लसूण, अक्रोड, ब्रोकोली, अ‍ॅवोकॅडो खाल्ल्यानंही यकृती निरोगी राहतं. याशिवाय पुरेशी झोपही गरजेची आहे. दिवसातून किमान 6 तास झोपणं आवश्यक आहे. उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं टाळा. तसंच सिगारेट आणि मद्यपान यापासून दूर राहा.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - लिव्हर रोग: लक्षणे, कारणे, उपचार...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 17, 2020, 11:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading