फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला, उरलेल्या भातापासून आता टेस्टी नाश्ता बनवा

फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला, उरलेल्या भातापासून आता टेस्टी नाश्ता बनवा

उरलेल्या भातापासून (leftover rice) तुम्ही बरेच चविष्ट (Tasty) आणि हेल्दी (Healthy) असे पदार्थ बनवू शकता.

  • Share this:

भात उरला (leftover rice) की आपण एकतर फोडणीचा भात करतो किंवा दही भात खातो. मात्र रोज रोज फोडणीचा भात खाऊन कंटाळा येतो, शिवाय हे आरोग्यासाठीही चांगलं नाही. त्यामुळे उरलेल्या भाताचं आणखी काय करायचं असा प्रश्न पडतो. खरंतर तुम्ही या भातापासून बरेच पदार्थ बनवू शकता. विशेष म्हणजे दररोज नाश्त्याला काय करायचंं असा प्रश्नही पडतो. त्यामुळे कांदेपोहे, उपमा असे पदार्थ खाऊनही तुम्हाला कंटाळा आला असेल, तर या भातापासून तुम्ही टेस्टी आणि झटपट असा नाश्ता बनवू शकता. तेदेखील तुमच्या घरात सहजरित्या उपलब्ध असलेले साहित्य वापरून.

डोसा - भातापासून काही हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही त्यापासून डोसा बनवू शकता.  यासाठी तुम्हाला डोशाच्या पीठाप्रमाणे पीठ आंबवण्याची गरज नाही, तर झटपट असा तयार होणारा हा भाताचा डोसा आहे. त्यासाठी फक्त भात, दही, रवा, बेकिंग सोडा इतकंच साहित्य पुरेसं आहे. 

इडली - भातापासून तुम्ही सॉफ्ट आणि हेल्दी अशी इडलीही बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त भात, रवा आणि बेकिंग सोडा लागेल.

अप्पे - डोसा नको, इडली नको मात्र अगदी कमी तेलात बनवलेले चविष्ट असे अप्पे खावेस वाटले, तर तुम्ही तेदेखील या भातापासून बनवू शकता. आपण एरवी जसे अप्पे बनवतो, अगदी तशीच ही पद्धत आहे. तुम्हाला हवं तर यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता. ज्यामुळे ते फक्त टेस्टीच नाही तर अधिक हेल्दी बनेल.

उत्तप्पा - हेल्दी आणि टेस्टी असं खायचं असेल तर तुम्ही उरलेल्या भाताचा उत्तपाही बनवू शकता. त्यावर तुम्ही टॉपिंग म्हणून तुमच्या आवडीनुसार भाज्या अॅड करू शकता. अगदी इंडियन स्टाइल पिझ्झा म्हणून तुम्ही हे खाऊ शकता.

भजी - कुरकुरीत भजी खायचं मन झालं आहे, तर फक्त कांदा, बटाटा भजी कशाला? आता भातापासूनही भजी करा. तुमच्या जिभेवर या भजीची टेस्ट कायम रेंगाळत राहिल.

क्रिस्पी बॉल्स - भजीपेक्षा काही तरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर तुम्ही क्रिस्पी राइज बॉल बनवू शकता. मस्त आंबट गोड चटणी, टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचअपसह याचा आस्वाद घ्या.

अन्य बातम्या

दररोज दूध पिताय सावधान ! हाडं मजबूत ठेवणाऱ्या दुधामुळे होतोय जीवघेणा आजार

ब्रेडवर लावताय ते Butter अळ्यांपासून बनवलेलं तर नाही ना? Video पाहून येईल किळस

First published: March 1, 2020, 2:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading