मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

खतरनाक आहे ही गोगलगाय; कुठे दिसली तर चुकूनही तिच्या जवळ जाऊ नका नाहीतर...

खतरनाक आहे ही गोगलगाय; कुठे दिसली तर चुकूनही तिच्या जवळ जाऊ नका नाहीतर...

पावसाळ्यात अशी गोगलगाय तुम्हाला दिसली तर तिच्यापासून दूरच राहा.

पावसाळ्यात अशी गोगलगाय तुम्हाला दिसली तर तिच्यापासून दूरच राहा.

पावसाळ्यात अशी गोगलगाय तुम्हाला दिसली तर तिच्यापासून दूरच राहा.

  • Published by:  Priya Lad
लंडन, 16 जुलै : जुलै पावसाळ्यात बरेच छोटे-मोठे कीटक, कीडे, प्राणी दिसू लागतात, जे एरवी कधीच दिसत नाहीत. त्यातील काही कीटक आपल्या ओळखीचे असतात तर काहींना आपण कधीच पाहिलं नसतं. या फोटोतील जीवालाही तुम्ही तसं ओळखत असाल. हा जीव म्हणजे गोगलगाय आहे. पण पावसाळ्यात अशी गोगलगाय तुम्हाला दिसली तर तिच्यापासून दूरच राहा. तिच्या जवळ जाणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं (Deadly snail). भारतातही बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात अशा गोगलगाय दिसतात. पण या फोटोतील गोगलगाय थोड्या वेगळ्या आहेत. या सध्या लंडनच्या रस्त्यावर आढळल्या आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या या दोन गोगलगायींचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. एका बस स्टँडजवळील कचऱ्याच्या डब्यात एका भाजीच्या पिशवीत ते आढळले. याचा आकार खूप मोठा आहे. लंडन ब्रीज रेल्वे स्टेशनजवळ सर्वात आधी याला 20 वर्षांच्या जॅमी ली मॅकएवॉय नावाच्या मुलाने पाहिलं. त्याने सांगितल्यानुसार या गोगलगाय त्याच्या हाताइतक्या मोठ्या होत्या.  त्यांची लांबी जवळपास आठ इंच आहे. हे वाचा - Dog Video - जिथं चाटला विचित्र जीव तिथं हुंगताच श्वानाचा मृत्यू; काही क्षणातच तडफडून तडफडून झाला मृत्यू कोरोना काळात लोक आजारी पडत असतानाया गोगलगाय अशा रस्त्यावर फिरणं धोकादायक आहे. यांना आफ्रिकन लँड स्नेलही म्हटलं जातं. या खूप खतरनाक असतात.  त्या कुणाला चावत नाहीत पण आपल्यासोबत जीवघेणा परजीवी घेऊन फिरतात. त्यांच्या शरीरात  मलूसकस नावाचा एक पॅरासाइट असतो, जो जगातील सर्वात धोकादायक स्पिशिजपैकी एक आहे. जे माणसांसाठी खतरनाक आहेत. उकाड्यात हे मृत होतात. हे वाचा - विचित्र जीवाने सर्फिंग बोटला दिला धक्का, तरुण पाण्यात पडताच...; थरकाप उडवणारा VIDEO लोकांनी याला पाहताच प्राणीप्रेमींना कळवलं. त्यानंतर वाइल्डलाइफ वोलेंटियर बेथ क्रिवेलीने एका टॉवेलमध्ये गुंडाळून त्यांना पकडलं.
First published:

Tags: Lifestyle, World news

पुढील बातम्या