मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Kajal Tips : तुम्हीही दररोज डोळ्यांना काजळ लावता का? या महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या

Kajal Tips : तुम्हीही दररोज डोळ्यांना काजळ लावता का? या महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या

डोळ्यांना काजळ लावणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक काजळांमध्ये अशी रसायनं असतात, ज्यामुळं डोळ्यांना अ‌ॅलर्जी होते आणि डोळे कोरडे, रुक्ष होतात.

डोळ्यांना काजळ लावणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक काजळांमध्ये अशी रसायनं असतात, ज्यामुळं डोळ्यांना अ‌ॅलर्जी होते आणि डोळे कोरडे, रुक्ष होतात.

डोळ्यांना काजळ लावणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक काजळांमध्ये अशी रसायनं असतात, ज्यामुळं डोळ्यांना अ‌ॅलर्जी होते आणि डोळे कोरडे, रुक्ष होतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 06 डिसेंबर : अनेक महिलांना मेकअप करायला आवडतो. तयार होण्यासाठी फारच घाई-गडबड झाली तरी महिला सुंदर दिसण्यासाठी काजळ तरी लावतातच. काजळ स्त्रियांचा लूक अधिक खास बनवते. आकर्षक डोळे दिसण्यासाठी महिला काजळ लावणं पसंत करतात. हल्ली बाजारात विविध प्रकारची काजळ उपलब्ध आहेत. मात्र, तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, डोळ्यांना काजळ लावणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक काजळांमध्ये अशी रसायनं असतात, ज्यामुळं डोळ्यांना अ‌ॅलर्जी होते आणि डोळे कोरडे, रुक्ष होतात. जाणून घेऊया काजळ लावण्याचे दुष्परिणाम -

काजळामध्ये पारा, शिसं आणि पॅराबेन्ससारखे घटक आढळतात. ज्यामुळं डोळ्यांमध्ये कॉन्ज्युक्टिवाइटिस (conjunctivitis - डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह) होऊ शकतो. म्हणजेच, सामान्य भाषेत त्याला 'डोळे येणं' म्हणतात. जर तुम्ही रोज काजळ लावत असाल तर, त्यामुळं डोळ्यांची अ‌ॅलर्जी, कॉर्नियल अल्सर आणि ड्राय आईज (Allergies, corneal ulcers and dry eyes) या तक्रारी उद्भवू शकतात. शिवाय, डोळ्यांच्या आत जळजळ होऊ शकते, ज्याला यूवाइटिस (uveitis) म्हणतात.

घरातच बनवा रसायनमुक्त काजळ

जर तुम्हाला काजळ लावायला आवडत असेल तर, तुम्ही ते घरी सहज बनवू शकता. घरगुती काजल नैसर्गिक असून ते डोळ्यांना कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवत नाही.

हे वाचा - Gold Price: शेअर बाजारातील चढ-उतारादरम्यान सोनं महागलं, चांदीलाही झळाळी; काय आहे आजचा भाव?

साहित्य

एक ताटली, एक मोठा चमचा, तूप, मातीचा दिवा, वात आणि एकाच आकाराच्या दोन वाट्या

पद्धत

काजल बनवण्यासाठी आधी दिवा लावावा, त्याच्या दोन्ही बाजूंना वाट्या ठेवाव्यात. ताटलीला थोडं तूप लावून त्यावर ठेवावी. यानंतर 20 ते 30 मिनिटांनी काजळी ताटलीला जमा होईल. ही काजळी जमा करून डबीत ठेवा. यात एक थेंब खोबरेल तेला घालून मिसळा. अशा प्रकारे तुमचं घरचं काजळ तयार होईल. यामुळं डोळ्यांना इजा होणार नाही.

हे वाचा - फक्त एका Missed Call मध्ये करा तुमचं WhatsApp रजिस्ट्रेशन, जाणून घ्या Step by Step प्रोसेस

काजळ लावल्यानंतर या गोष्टी लक्षात ठेवा

सुंदर डोळ्यांसाठी साधारणपणे महिला लायनर आणि काजळ वापरतात. तुम्हाला डोळे सुंदर ठेवण्याबरोबरच डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांना लावलेलं लायनर आणि मस्करा काढणे खूप गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांचा मेकअप करण्याचं साहित्य कधीही कोणाशीही शेअर करू नका. तसंच, डोळ्यांच्या मेकअपचं कोणतंही उत्पादन एक्सपायरी डेटनंतर वापरू नका.

(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips