मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

ऑफिसमध्ये काम करताना या दिवसात येते सुस्ती; फ्रेश-एनर्जेटिक राहण्यासाठी या आहेत टिप्स

ऑफिसमध्ये काम करताना या दिवसात येते सुस्ती; फ्रेश-एनर्जेटिक राहण्यासाठी या आहेत टिप्स

घरी किंवा ऑफिसमध्ये बसून काम करत असाल तेव्हा अधिक सुस्ती येते. अनेकदा दुपारचं जेवण झाल्यावर झोप लागते, काम करण्याची इच्छा नसते, पण काम तर वेळेवर पूर्ण करावे लागते.

घरी किंवा ऑफिसमध्ये बसून काम करत असाल तेव्हा अधिक सुस्ती येते. अनेकदा दुपारचं जेवण झाल्यावर झोप लागते, काम करण्याची इच्छा नसते, पण काम तर वेळेवर पूर्ण करावे लागते.

घरी किंवा ऑफिसमध्ये बसून काम करत असाल तेव्हा अधिक सुस्ती येते. अनेकदा दुपारचं जेवण झाल्यावर झोप लागते, काम करण्याची इच्छा नसते, पण काम तर वेळेवर पूर्ण करावे लागते.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 13 एप्रिल : उन्हाळ्याच्या (summer) दिवसात काम करत असताना आळस-सुस्ती येणं ही सर्वसामान्य समस्या आहे. आपण घरी किंवा ऑफिसमध्ये बसून काम करत असाल तेव्हा अधिक सुस्ती येते. अनेकदा दुपारचं जेवण झाल्यावर झोप लागते, काम करण्याची इच्छा नसते, पण काम तर वेळेवर पूर्ण करावे लागते. अशा परिस्थितीत स्वत:ला फ्रेश-एनर्जेटिक कसे ठेवायचे हा मोठा प्रश्न असतो. उन्हाळ्यात आपण सकस आहार आणि पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ घेत नसाल डिहायड्रेशनचा त्रास होतो. सुस्ती घालवण्यासाठी आणि काम वेगात होण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात (To get rid of sluggishness while working in summer) जाणून घेऊ. तुम्ही ऑफिस किंवा घरून काम करत असाल तर सुस्ती घालवण्यासाठी हंगामी पदार्थ खा. उन्हाळ्यात भरपूर भाज्या आणि फळे खा. त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात, जे या ऋतूमध्ये होणाऱ्या आजारांपासूनही तुमचे संरक्षण करतात. विविध रंगांची फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीराला एन्झाईम्स, अँटिऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल्स, जीवनसत्त्वे, खनिजे यांसारख्या विविध पोषक तत्वांचा पुरवठा होतो. यामुळे शरीर आतून फ्रेश राहते आणि पचनसंस्थाही निरोगी राहते. यामुळे बसून काम करताना जास्त खाल्ले तरी सुस्ती, आळस येत नाही. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी आणि इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण जास्त असलेली फळे, भाज्या खा. यामुळे दिवसभर उर्जा पातळी चांगली राहील आणि तुम्ही तुमचे काम चांगल्या मूडमध्ये करू शकाल. अधिक हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन, पुरेसे पाणी पिणे आणि इतर आरोग्यदायी उन्हाळ्यातील पेये घेतल्याने ऊर्जा पातळी उच्च राहते. ऑफिसला गेलात तर जेवणाच्या डब्यात संत्री, टरबूज, काँटालूप, स्ट्रॉबेरी, लिंबूपाणी नक्की घ्या. मध्येच ब्रेक घ्या आणि थोडे चाला म्हणजे सुस्ती आणि झोप निघून जाईल. असे केल्याने शरीरातील रक्ताभिसरणही योग्य राहील आणि मूडही फ्रेश राहील. जास्त तेलकट-मसालेदार, जास्त कॅलरी असलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ खाणे टाळा. कॅफीन, चहा, कॉफी, अल्कोहोल यांचे अतिसेवन टाळा, यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. प्रक्रिया केलेले अन्न, पॅकबंद फळांचे ज्यूस, साखरयुक्त पेये, कोल्ड्रिंक्सही जास्त पिऊ नका. हे सर्व आरोग्यासाठी हानिकारक असण्याबरोबरच त्यामुळे सुस्ती, ऊर्जा राहत नाही, आळस वाढतो. हे वाचा - अगदी परफेक्ट जीन्स तुम्हाला मिळणारच! कधीही खरेदी करताना या टिप्स ध्यानात ठेवा ऑफिसमध्ये बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. घरी शिजवलेले ताजे अन्न न्या. फक्त माफक प्रमाणात खा, कारण उन्हाळ्यात पचन मंद होते. एक ग्लास पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. हायड्रेट राहण्यासाठी पाणी प्यायला ठेवा. यामुळे तुम्हाला लघवी जास्त होईल आणि टॉयलेटला जाताना तुमची हालचाल होईल, ज्यामुळे सुस्ती देखील कमी होईल. ऑफिसमध्ये आळस येत असेल तर शक्य असल्यास 5-10 मिनिटे योगा आणि व्यायाम करू शकता. तुम्ही डोळे मिटून खुर्चीवर बसून ध्यान करण्याचा प्रयत्न करू शकता. रोटेशनमध्ये खांदे हलवा, पाय स्ट्रेच, शरीर स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास घ्या. उभे राहून पुढे वाकण्याचे व्यायाम करा. आपल्या बोटांनी मजल्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. यामुळे पाठ आणि पाठदुखीही कमी होईल. हे वाचा - तुम्हीही जेवणानंतर लगेच पाणी पिता का? इतके प्रॉब्लेम्स नकळत मागे लागतात दररोज 7-8 तास पुरेशी झोप घ्या. यामुळे मानसिक आणि शारीरिक फायदा होईल. जर तुमची झोप पूर्ण झाली असेल तर तुम्हाला सकाळी फ्रेश वाटेल. रात्री उशिरापर्यंत जागे राहून मोबाईल, लॅपटॉप चालवू नका. पुरेशी झोप घेतली तर ऑफिसमध्ये सुस्ती, आळस किंवा झोप येणार नाही. तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल आणि सर्व काम व्यवस्थितपणे करू शकाल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Summer, Summer hot

पुढील बातम्या