Home /News /lifestyle /

इम्युनिटीपासून डाइजेशनपर्यंत.. लवंगांचा काढा पावसाळ्यात पिण्याचे आहेत खास फायदे

इम्युनिटीपासून डाइजेशनपर्यंत.. लवंगांचा काढा पावसाळ्यात पिण्याचे आहेत खास फायदे

लवंग यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आणि पचन सुधारण्याचे काम करतात. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांबरोबरच, त्यात अँटी-व्हायरल आणि वेदनाशामक गुणधर्म देखील आहेत.

    मुंबई, 26 जून : भारतीय आयुर्वेदात अनेक शतकांपासून लवंगांचा वापर केला जात आहे. बदलत्या ऋतूमध्ये खोकला, सर्दी, पोटाची समस्या किंवा कोणत्याही प्रकारचे संसर्ग दूर करण्यासाठी लवंग खूप फायदेशीर आहे. WellbeingNutrition मध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार, लवंगात दाहक-विरोधी, अँटीमाइक्रोबियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, घसा खवखवणे कमी करण्यासाठी प्रभावी असतात. याशिवाय लवंग यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आणि पचन सुधारण्याचे काम करतात. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांबरोबरच, त्यात अँटी-व्हायरल आणि वेदनाशामक गुणधर्म देखील आहेत. लवंग चहा किंवा लवंगाचा काढा प्यायल्याने आपण स्वतःला हंगामी आजारांपासूनही वाचवू शकता. लवंगाचा काढा पिण्याचे फायदे - चयापचय वाढते - लवंगाचा काढा प्यायल्याने चयापचय वाढते. रोज सकाळी लवंगाचा काढा प्यायल्यास वजनही कमी होईल आणि पचनक्रियाही चांगली होईल. सर्दीचा त्रास - लवंगात अँटी-व्हायरल, अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ते सर्दी आणि व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यास मदत करतात. सर्दीमध्ये लवंगाचा काढा प्यायल्यास घशात दुखण्याची समस्याही कमी होते. दातदुखी कमी होते - दातांमध्ये तीव्र वेदना होत असतील तर लवंग चहा किंवा काढा प्या. असे केल्याने तुमचा त्रास कमी होईल आपल्याला बरे वाटेल. लवंगामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात, जे हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. प्रतिकारशक्ती वाढवते - लवंगाच्या काढ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती किंवा प्रतिकारशक्ती सुधारण्याची शक्ती असते, आपल्याला संसर्गाच्या धोक्यापासून वाचवते. हे वाचा - ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या पचन सुधारते - पचनसंस्था सुधारण्यासाठी लवंगाचा काढा देखील खूप फायदेशीर आहे. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी आपण लवंगाचा काढा सेवन करू शकता. सायनसचा त्रास - सायनसच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी लवंगाचा काढा घ्यावा. हा काढा प्यायल्याने आपल्याला सायनससारख्या गंभीर समस्यांमध्ये फायदा होईल. वास्तविक, युजेनॉल नावाचे तत्व लवंगात आढळते, जे शरीरातील श्लेष्मा काढून टाकण्यास मदत करते. हे वाचा - नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा लवंग काढा कसा बनवायचा - एका कढईत सुमारे 2 कप पाणी उकळा. पाणी उकळायला लागल्यावर त्यात 5 ते 6 लवंगा घाला. त्यात तुम्ही चहापत्तीही टाकू शकता. मिश्रण चांगले उकळून गाळून कपात घ्यावे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या