मुंबई, 8 जून : तरुणाई Latest Fashion म्हणून एक्स्ट्रा अॅक्सेसरीज वापरण्यावर जास्त भर देत आहे. स्टाइल म्हणून वापरल्या जाणाऱ्या स्कार्फचा मुलींना दुहेरी उपयोग करता येत असल्यामुळे सद्या तो तरुणाईच्या गळ्यातला फॅशन आयकॉ़न बनला आहे.
हल्ली मुली सर्रास स्कार्फ वापरताना दिसतात. काही मुली फॅशन म्हणून तर काही मुली धूळ आणि उन्हापासून बचावासाठी चेहऱ्यावर स्कार्फ बांधतात. मुलींप्रमाणेच मुलंसुद्धा यात मागे नाहीत. स्टाइल म्हणून आवडू लागलेले स्कार्फ उन्हाळ्यातही त्यांच्या गळ्याला तसेच घट्ट बिलगून राहतात.
Latest Fashion : कुठल्याही स्कीन टोनवर शोभून दिसतात 'हे' रंग
Latest Fashion म्हणून एक्स्ट्रा अॅक्सेसरीज वापरण्याकडे कॉलेजच्या तरुणाईचा जास्त कल आहे. या स्कार्फचा मुलींना दुहेरी उपयोग होत असल्यामुळे कुठल्याही टी-शर्ट, कुर्ती, शर्ट किंवा पंजाबी ड्रेसवरही मुलींना स्कार्फ बांधता येतो.
बाईकवर लाँग ड्राइव्हला जाताना स्कार्फ हवाच. एरवी फॅशन म्हणून इन असलेला स्कार्फ आता युवापिढीचा गरजेचा ट्रेंड झाला आहे. काल परवापर्यंत चेहऱ्यावर रुमाल बांधणारी तरुण मंडळीसुद्धा आता उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून स्कार्फचा वापर करू लागली आहे. बाईक चालवताना हवेच्या माऱ्यामुळे हेअर स्टाइल बिघडू नये म्हणून काही तरुण मुले या स्कार्फचा वापर करताना दिसतात. त्यात डिझायनर स्कार्फचा वापर जास्त दिसून येतो.
यशाचं शिखर सर करायचं असेल तर आत्मविश्वास हवाच; त्यासाठी लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी
स्कार्फ घालणाऱ्या मुलींनी गळ्यात इतर कुठले दागिने घातले नाही तरी चालतात. हा एक स्कार्फचा फायदा आहे. पेस्टल शेड, सिल्क, कॉटन अशा गोष्टींचा विचार स्कार्फ खरेदी करताना केला जातो. जीन्स आणि कुर्तीजवर स्कार्फ गुंडाळणे फॅशन मुलींमध्ये जास्त रुढ होत आहे.
अगदी कॉलेज कॅम्पसपासून फाइव्ह स्टार ग्लॅमरस सोशलाईट्सपर्यंत सगळ्यांनाच स्कार्फ हे स्टायलीश वाटायला लागला आहे. म्हणूनच स्टाइल म्हणून वापरला जाणारा स्कार्फ आता फॅशन आयकॉन ठरतो आहे.