मुंबई, 01 जानेवारी: भारताची सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे. याप्रसंगी त्यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'नरेंद्र भाई मोदी तुम्हाला माझा सादर प्रणाम. तुम्ही देशासाठी जे काम करत आहात, ते प्रशंसनीय आहे. मी तुम्हाला नवं वर्षाच्या शुभेच्छा देते आणि तुमच्या आईला प्रणाम करते' अशा शब्दांत लता मंगेशकर यांनी नरेंद्र मोदी यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी त्यांनी ट्वीटमध्ये त्यांनी स्वतः गायलेल्या 'वंदे मातरम' गाण्याची लिंकही टाकली होती. शालेय शिक्षण घेताना स्वातंत्र्यदिनी आणि प्रजास्ताक दिनी लता दीदींच्या आवाजातलं हे देशभक्तीपर गाणं नेहमीच अंगावर शहारं आणायचं. या ट्वीटला प्रतिक्रिया देताना अनेक चाहत्यांनी या दिवसाची आठवण करून दिली आहे.
सादर प्रणाम नरेंद्रभाई. आप देश के लिए जो काम कर रहें हैं वो प्रशंसनीय है,मैं आप को बधाई देती हूँ. आपको नव वर्ष की शुभकामनाएँ देती हूँ, और आपकी माताजी को प्रणाम करती हूँ.@narendramodi . https://t.co/ofTumrEFYO
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) January 1, 2021
काही काळानंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवाराला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या ट्वीटरमध्ये रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचाही उल्लेख केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होईल याची खात्रीही त्यांनी दिली. तुम्ही नेहमी महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करता असं म्हणतं उद्धव ठाकरेंचही कौतुक केलं आहे.
@OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/T7mc0fJT0d
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) January 1, 2021
लता मंगेशकर यांनी गेल्या सहा दशकांपासून आपल्या आवाजानं समस्त भारतीयांच्या श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांनी गायनाचा एक इतिहास निर्माण केला आहे. त्यांच्या शिवाय गायन क्षेत्र खरंच अपूर्ण वाटतं. त्यांनी आतापर्यंत 20 पेक्षा अधिक भाषांतून तीस हजार पेक्षा अधिक गाणी त्यांनी आपल्या आवाजात गायली आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची मशाल केवळ भारतासाठीच सिमीत राहिली नाही, तर जगानेही त्यांची दखल घेतली. 2001 साली भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून भारत सरकारने त्यांचा सन्मान केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, Uddhav thackeray