Home /News /lifestyle /

2020 चं शेवटचं चंद्र आणि सूर्यग्रहण कधी? ग्रहणाचा काय होईल प्रभाव जाणून घ्या

2020 चं शेवटचं चंद्र आणि सूर्यग्रहण कधी? ग्रहणाचा काय होईल प्रभाव जाणून घ्या

2020 या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 30 नोव्हेंबरला दिसणार आहे.

    नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर: 2020 या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 30 नोव्हेंबरला दिसणार आहे. हा दिवस दिवाळीनंतर अगदी 16 दिवसांनी येत आहे. आपल्याला माहीत असेल की दिवाळी अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाते आणि चंद्रग्रहण त्याच्या 16 दिवसानंतर होणार आहे. चंद्रग्रहणानंतर पुढील महिन्याच्या 14 तारखेला म्हणजेच 14 डिसेंबर रोजी सूर्यग्रहण होईल. या दोन खगोलशास्त्रीय घटना भारतातून दिसणार नाहीत. जगातील इतर देशांमधून पाहिल्या जाऊ शकतात. भारतात ग्रहणं दिसणारच नसल्यामुळे भारतात सूतक पाळण्याचा संबंध नाही. परंतु, जगातील इतर भागात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणांमुळे सुतक कालावधी मानला जाईल आणि तिथले श्रद्धावान ग्रहणकाळात कोणतंही शुभ कार्य करणार नाहीत. खगोलशास्त्रीय तज्ञांच्या मते, या वर्षी 2020 मध्ये 6 ग्रहणं होणार होती. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणासह आतापर्यंत चार ग्रहणं लागली आहेत. यावर्षी 30 नोव्हेंबरला चंद्रग्रहण होईल. ज्योतिषांचे म्हणणे आहे की ग्रहण लागण्यामुळे सुतक कालावधी लागू होणार नाही. अशा परिस्थितीत भारतातील लोकांना चिंता करण्याची गरज नाही, कारण हे चंद्रग्रहण दिसणार नाही. नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी लागणारं हे चंद्रग्रहण आशियातील काही देशांमध्ये तसंच अमेरिकेच्या काही भागांतही दिसेल. याशिवाय हे ग्रहण ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक महासागर प्रदेशातही दिसेल. 30 नोव्हेंबरला हे चंद्रग्रहण दुपारी 1.04 वाजता सुरु होईल व 3.13 वाजता ह्याचा मध्यकाल होऊन हे ग्रहण संध्याकाळी 5.22 वाजता समाप्त होईल. हे वाचा-खडतर आव्हानांचा सामना करत काश्मिरमध्ये उभी राहिली महिला फूटबॉल टीम आपल्या माहितीसाठी सांगतो, चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीही सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते. त्यामुळे चंद्र पृथ्वीच्या सावलीने झाकून जातो. चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिले जाऊ शकते, परंतु सूर्यग्रहण नव्हे. यावर्षी 14 डिसेंबर रोजी वर्षाचे शेवटचं सूर्यग्रहण होईल. हे ग्रहण 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल आणि 15 डिसेंबर रोजी 12 वाजता समाप्त होईल. सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र हा पृथ्वी आणि सूर्यामध्ये येतो, ज्यामुळे सूर्य अर्धवट किंवा पूर्ण झाकला जातो. या खगोलशास्त्रीय घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. सूतक कालावधी म्हणजे काय? ज्योतिषांच्या मते, सूतक कालावधी हा सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. यावेळी अनेक श्रद्धावान लोक कोणतेही शुभ कार्य करत नाहीत. सूतक काल ग्रहण संपल्यानंतर संपतो.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या