Home /News /lifestyle /

माकडाच्या हाती... माणसामुळे लागलेल्या दारूच्या व्यसनापायी वानराचा गेला जीव; लिव्हर झालं खराब

माकडाच्या हाती... माणसामुळे लागलेल्या दारूच्या व्यसनापायी वानराचा गेला जीव; लिव्हर झालं खराब

राजू नावाच्या (langur monkey dies of alcoholism ) या वानराला पूर्वी कधीतरी दारूची बाटली मिळाली आणि त्याला व्यसनही लागलं. अखेर लिव्हर आणि किडनी खराब होऊन त्याचा मृत्यू झाला.

बंगळुरू, 21 ऑक्टोबर: मद्यपानाच्या व्यसनामुळे माणसांचा मृत्यू झाल्याच्या किती तरी बातम्या तुम्ही वाचल्या असतील; पण कोणत्या प्राण्याचा दारूच्या व्यसनामुळे मृत्यू झाल्याचं कधी वाचलंय का? आता प्रत्यक्षात तशी घटना घडली आहे. कर्नाटकातल्या (Karnataka) पिलिकुला बायोलॉजिकल पार्कमधल्या (Pilikula Biological Park) एका लंगूर जातीच्या माकडाचा (Langur Monkey) रविवारी (17 ऑक्टोबर) मृत्यू झाला. हे वानर होतं 21 वर्षांचं. त्याला पूर्वी मद्यपानाचं व्यसन जडलं होतं. त्यातूनच त्याच्या किडनीज (Kidneys) आणि लिव्हरवर (Liver) विपरीत परिणाम झाला आणि त्याचा मृत्यू झाला. राजू असं त्याचं नाव होतं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 2005मध्ये पडुबिद्री (Padubidri Town) शहरातल्या एका बारजवळून या लंगूर माकडाला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची तब्येत बिघडलेली होती. पिलिकुला बायोलॉजिकल पार्कचे संचालक एच. जे. भंडारी यांनी सांगितलं, 'राजू लंगूर माकडाचं वास्तव्य बारजवळ होतं. तिथे येणारे अनेक ग्राहक त्यालाही दारू पाजत. त्यामुळे त्याला दारूचं व्यसन लागलं. 2005 साली आम्हाला बारमालकाचा फोन आला, की त्या माकडाची प्रकृती बिघडली आहे. त्यानंतर त्याला तिथून पार्कमध्ये आणून उपचार सुरू करण्यात आले.' पठ्ठ्याने घराच्या परसबागेत फुलवली गांजाची शेती; पोलिसांच्या नजरेत येताच असे हाल राजूवर उपचार करणाऱ्या टीमच्या असं लक्षात आलं, की मद्यपानाचं व्यसन सुटताना (Withdrawal Symptoms) जी काही लक्षणं दिसतात, ती त्याच्यात दिसत आहेत. कारण ते माकड त्याला खायला दिलेल्या वस्तू सातत्याने नाकारत होतं. म्हणून मग उपचार सुरू केल्यावर काही दिवस त्याला रोज अगदी थोड्या प्रमाणात मद्य (Alcohol) दिलं जात होतं. त्यानंतर महिनाभरात ते प्रमाण कमी कमी करत त्याचं मद्यपानाचं व्यसन पूर्णतः बंद करण्यात आलं. त्याची प्रकृतीही सुधारली. त्यानंतर त्या माकडाने वेगवेगळी फळं, भाज्या वगैरे आपल्या नैसर्गिक आहार खायला सुरुवात केली. त्यानंतर हे राजू लंगूर माकड या बायोलॉजिकल पार्कमधल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक बनलं, अशी माहितीही भंडारी यांनी दिली. तुमचा कंप्यूटर स्लो झालाय? या सोप्या पद्धतीने असा होईल सुपरफास्ट राजू लंगूर माकडाच्या मृत्यूचं नेमकं कारण कळण्यासाठी त्याचं पोस्टमॉर्टेम (Postmortem) करण्यात आलं. त्यातून असं कळलं, की त्याची मूत्रपिंडं आणि यकृतात बिघाड निर्माण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याचा व्हिसेरा बेंगळुरूतल्या प्रयोगशाळेत अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे, जेणेकरून राजूच्या मृत्यूचं कारण अधिक नेमकेपणाने स्पष्ट होऊ शकेल. लंगूर माकडांना हनुमान लंगूर (Hanuman Langur) असंही म्हटलं जातं. पिलिकुला बायोलॉजिकल पार्कमध्ये सध्या आणखी चार हनुमान लंगूर माकडं आहेत. या माकडांचं सरासरी आयुर्मान 18 ते 20 वर्षं असतं. राजूच्या मृत्यूच्या वेळी त्याचं वयही साधारण तेवढंच होतं; मात्र माणसांनी आपल्या वाईट सवयी त्याला लावल्यामुळे त्याला शारीरिक त्रास भोगावे लागले, हे दुर्दैवी असल्याची भावना निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अलीकडेच कर्नाटकातल्या सुरशेट्टीकोप्पा इथल्या ग्रामस्थांनी एका मादी लंगूर माकडावर हिंदू धर्माप्रमाणे अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार केले. ऑगस्ट महिन्यात ही माकडीण विजेच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे मरण पावली होती. त्या माकडिणीची दोन पिल्लं तिच्या मृतदेहापासून बाजूलाच होत नव्हती; मात्र नंतर गावकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे ती बाजूला झाली. गावातल्या हनुमान मंदिराजवळ त्या माकडिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळीही ती पिल्लं तिथे उपस्थित होती. आता गावकरी त्या पिल्लांची काळजी घेत आहेत.
First published:

Tags: Alcohol, Karnataka

पुढील बातम्या