KVP की SBI FD कुठल्या योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल अधिक फायदा?

KVP की SBI FD कुठल्या योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल अधिक फायदा?

गुंतवणूक करताना कोणत्या योजनेत तुमचे पैसे लवकर वाढतील आणि ते किती वाढतील याची योग्य शहनिशा करून गुंतवणूक करायला हवी.

  • Share this:

मुंबई 6 मे: तुम्ही फिक्स डिपॉझिट करण्यासाठी पर्याय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जेव्हा पैशाची गुंतवणूक करण्याचा विचार मनात येतो,तेव्हा अजूनही पोस्ट ऑफिसच्या योजना किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एफडीलाच लोकांची पसंती असते. पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्किममध्ये बँकांच्या तुलनेत फिक्स डिपॉझिटवर जास्त व्याज मिळतं. मात्र, तुम्ही गुंतवणूक करताना कोणत्या योजनेत तुमचे पैसे लवकर वाढतील आणि ते किती वाढतील याची योग्य शहनिशा करून गुंतवणूक करायला हवी. याबाबतचं वृत्त मनी 9 ने दिलंय.

आज आम्ही पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र आणि SBI Fixed Deposit स्कीम (KVP Vs SBI FD)यांची तुलना केली आहे. यातील कोणती योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते,हे पहा आणि मग तुमचा निर्णय घ्या.

पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र (KVP)योजनेत गुंतवणूक केल्यास6.9%व्याज मिळतं.तर,स्टेट बँकेच्याSBI Fixed Depositमध्ये गुंतवणूक केल्यास5.40%व्याजमिळतं. दोन्हीची तुलना केल्यास व्याज दरात बराच फरक आहे. व्याज दर बघता पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक केल्यास जास्त फायदा आहे. मात्र,गुंतवणूक करताना केवळ व्याज दर नाही,तर इतर बाबींकडेही लक्ष दिलं पाहिजे.

किसान विकास पत्र (KVP)

–किसान विकास पत्रामध्ये(KVP)गुंतवणूक केल्यास6.9%व्याजमिळेल.

– KVPमध्येतुम्ही कमीत कमी रक्कम1000रुपएगुंतवणूक करू शकता. तर जास्तीत जास्त रकमेसाठी कोणतंच लिमिट नाही.

–या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचे वय18वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. या योजनेत सिंगल आणि जॉईंट अकाऊंटची सुविधा उपलब्ध आहे.

-अल्पवयीन स्वतः या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही. मात्र,त्यांचे पालक त्यांचे अकाऊंट उघडू शकतात.

– 2.5वर्षाच्यालॉकइनपिरेडनंतरच गुंतवलेली रक्कम काढू शकता.

–डिपॉझिटवर इन्कम टॅक्स अक्टच्या कलम80 Cअंतर्गतटॅक्समधून सूट मिळते.

SBI Fixed Deposit -

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये(SBI)तुम्ही7दिवसांसाठी ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठीFDकरूशकता. यासाठी बँक तुम्हाला2.9ते5.4%व्याज देते.FDमध्ये5वर्षांसाठी गुंतवणूक केल्यासइन्कमटॅक्सअक्ट1961च्यासेक्शन80Cअंतर्गत टॅक्सवर सूट देण्यात येते.80Cया कलमांतर्गत 1000 रुपयांपासून1.5लाखरुपयांपर्यंतच्या पाच वर्षांच्या एफडीवर टॅक्समधून सूट देण्यात येते.

SBI एफडीवर किती व्याज देते –

जर तुम्ही 7 ते 45 दिवसांसाठी गुंतवणूक करत असाल तर एसबीआय तुम्हाला 2.9% व्याज देईल. 46 ते 179 दिवसांसाठी 3.9%,180 ते 210 दिवसांसाठी 4.4%,211 दिवस ते एक वर्षासाठी 4.4%,1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 4.9%,2 वर्षापेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमीसाठी 5.1%,3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमीसाठी 5.3% आणि 5 ते 10 वर्षांसाठी 5.4% व्याज एसबीआय देईल.

कोणत्या योजनेत पैसे लवकर डबल होणार?

किसान विकास पत्रमध्ये गुंतवणूक केल्यास 6.90% व्याज मिळतंय. तुम्ही रूल ऑफ 72 नुसार या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे डबल होण्यास 10 वर्ष 4 महिने लागतील. तरSBIच्याFDमध्ये 5.40% व्याज मिळतंय. त्या योजनेत रूल ऑफ 72नुसार पैसे डबल होण्यास 13 वर्ष 4 महीने लागतील.

आम्ही किसान विकास पत्र योजना आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एफडी योजनेची तुलना केली आहे. त्यानुसार तुम्ही गुंतवणुकीची रक्कम,कालावधी,व्याज दर या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज करून गुंतवणुकीसाठी पर्याय निवडू शकता.

First published: May 6, 2021, 7:31 PM IST

ताज्या बातम्या