मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

ATM मशिनमध्ये तुमचं कार्ड अडकलं तर काय होतं? कार्ड परत कसं मिळवायचं, सविस्तर जाणून घ्या

ATM मशिनमध्ये तुमचं कार्ड अडकलं तर काय होतं? कार्ड परत कसं मिळवायचं, सविस्तर जाणून घ्या

एटीएम कार्ड मशीनमध्ये का अडकतं हेदेखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड या काही कारणांमुळं एटीएम मशीनमध्ये अडकू शकतं. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

एटीएम कार्ड मशीनमध्ये का अडकतं हेदेखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड या काही कारणांमुळं एटीएम मशीनमध्ये अडकू शकतं. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

एटीएम कार्ड मशीनमध्ये का अडकतं हेदेखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड या काही कारणांमुळं एटीएम मशीनमध्ये अडकू शकतं. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : अनेक लोकांचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ATM मशीनमध्येच अडकल्याचं तुम्ही ऐकलं असेल. अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते. अशा स्थितीत लोक खूप अस्वस्थ होतात. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड एटीएम मशीनमध्येच अडकल्यास काय करायचं हे अनेकांना माहीत नाही. जाणून घेऊ, असं झाल्यास ATM कार्ड परत कसं मिळवायचं-

या कारणांमुळं एटीएम कार्ड अडकू शकतं मशीनमध्ये

एटीएम कार्ड मशीनमध्ये का अडकतं, हेदेखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड खालील कारणांमुळं एटीएम मशीनमध्ये अडकू शकतं.

- आपण बऱ्याच काळानंतर आपले तपशील प्रविष्ट केल्यास

- चुकीची माहिती प्रविष्ट केल्यास अनेक वेळा कार्ड अडकते

- वीज जोडणीमध्ये अडचण आल्यास आणि वीज गेल्यावर

- इतर तांत्रिक समस्या

- सर्व्हरशी कनेक्शनमध्ये समस्या

कार्ड परत कसं मिळवायचं

जर तुमचं डेबिट कार्ड एटीएम मशिनमध्ये (ATM system) अडकलं तर तुम्ही ताबडतोब बँकेला कळवावं. तुम्ही बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून हे कोणत्या शहरात आणि कोणत्या मशीनवर (म्हणजे ठिकाण) घडलं आहे ते सांगणं आवश्यक आहे.

जर ते एटीएम मशीन त्याच बँकेचं असेल ज्यामध्ये तुमचे खाते आहे, तर तुम्हाला तुमचं कार्ड अगदी सहज परत मिळेल. पण जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला काहीशा त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.

हे वाचा - Year Ender 2021: सिद्धार्थ शुक्ला ते दिलीप कुमार या प्रसिद्ध कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

ग्राहक सेवा दोन पर्याय देईल

तुम्ही कस्टमर केअरला याबाबत सांगाल, तेव्हा तेथून तुम्हाला दोन पर्याय दिले जातील. पहिला पर्याय म्हणजे कार्ड रद्द करणं. तुम्ही कार्ड रद्द केल्यास, तुम्हाला पुन्हा नवीन कार्ड बनवावं लागेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कार्डचा गैरवापर होईल, तर तुम्ही ते रद्द केलं पाहिजे. कार्ड रद्द केल्यानंतर, तुम्हाला नवीन कार्डसाठी अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर 7 ते 10 दिवसांत नवीन कार्ड तुमच्या घरी पोहोचेल. तुम्‍हाला कार्ड लवकर हवं असल्‍यास, तुम्‍ही कार्डसाठी तुमच्‍या बँकेच्‍या शाखेला भेट देऊ शकता.

हे वाचा - pumpkin : मधुमेहाच्या रुग्णांनी भोपळा खावा की खाऊ नये? जाणून घ्या त्याबाबतची सर्व माहिती

दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये कार्ड अडकल्यास दुसरा मार्ग आहे. खरं तर, सर्व बँका त्यांची अडकलेली कार्डे ज्या बँकांमध्ये ती कार्ड जारी केली जातात त्यांना पाठवतात. म्हणजेच, ज्या बँकेचं कार्ड त्याच बँकेला पाठवण्यात येईल. अशा पद्धतीनं तुमचं कार्ड तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत परत मिळवू शकता.

First published:

Tags: ATM, Tech news