मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोनापासून बचावासाठी कधी आणि किती वेळा प्यावा काढा?

कोरोनापासून बचावासाठी कधी आणि किती वेळा प्यावा काढा?

जास्त रोगप्रतिकारक शक्ती वाढेल म्हणून जास्त काढा (kadha) पिणंही योग्य नाही.

जास्त रोगप्रतिकारक शक्ती वाढेल म्हणून जास्त काढा (kadha) पिणंही योग्य नाही.

जास्त रोगप्रतिकारक शक्ती वाढेल म्हणून जास्त काढा (kadha) पिणंही योग्य नाही.

    मुंबई, 06 नोव्हेंबर : गेल्या कित्येक महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाव्हायरस (coronavirus) साथीच्या सामना करत आहे. दिवसेंदिवस या रोगाचा धोका अधिकच वाढत आहे. सध्या यावरील येणाऱ्या लशीची अजून बराच काळ आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे आयुष मंत्रालय आणि आरोग्यतज्ज्ञ  रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर  जोर देत आहेत. महासाथीच्या सुरुवातीपासूनच आयुर्वेदिक काढा  इम्युनिटी बूस्टर म्हणून घेण्याचा सल्ला दिला जात आहे. हा काढा पिण्यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होईल याबाबत जाणून घ्या. कुठल्याही गोष्टीचे जास्त प्रमाणात सेवन करणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. हीच गोष्ट काढ्याच्या बाबतीत सुद्धा लागू होते. काढा उकळून पुन्हा पुन्हा सेवन केल्यास सुद्धा आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. आपल्याला युरिन इन्फेक्शन, मुरूम, शरीरातून उष्णता बाहेर पडणं तसंच त्वचेचा कोरडेपणा येणं आणि तोंडात फोड येणं यासारखे त्रास होऊ शकतात. जर आपण खरोखरच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवू इच्छित असाल तर या सोप्या टीप्सच्या मदतीने आपण योग्य प्रमाणात आणि योग्य रितीनं काढ्याचा उपयोग करू शकता. दिवसातून अर्धा कप काढा प्यावा आपण दिवसातून तीन वेळा काढा पिणाऱ्या लोकांपैकी आहात का? आपण असं करत असल्यास त्वरित ते थांबवा. दिवसातून अर्धा कपापेक्षा जास्त काढा पिणं हे कधीकधी धोकादायक ठरू शकतं. हिवाळ्यात मात्र एका दिवसात दोन कप काढा प्यायलात तर चालू शकतं. थंड गुणधर्म असलेल्या औषधी वनस्पतीचा वापर काढा बनवताना हे महत्त्वाचं आहे की त्याच्यात थंड गुणधर्म असलेल्या औषधी वनस्पतींचा समावेश असावा. या थंड औषधी वनस्पतींमुळे आपल्याला पोटाशी संबंधित कुठलीही समस्या होणार नाही. यासाठी तुम्ही काढ्यामध्ये जेष्ठमध, वेलदोडा, गुलाबाच्या पाकळ्या यांचा समावेश करु शकता. नियमितपणे पाणी प्या काढा काही प्रमाणात शरीरासाठी उष्ण असतो, ज्यामुळे पोटात अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी पुदिना आणि नारळ पाण्याचं सेवन करणं हे शरीरासाठी चांगलं आहे. हे आपल्या पोटासाठी सुद्धा थंड असतं. त्याचसोबत नियमितपणे योग्य प्रमाणात पाणी देखील पोटात जायलाच हवं. नियमितपणे काढा पिऊ नये जरी काढा कोरोना विषाणू आणि इतर रोगांवरविरुद्ध लढायला मदत करत असेल. तरीही नियमितपणे जास्त काळ याचं सेवन करणं हेदेखील शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. तीन आठवड्यापर्यंत काढ्याचे नियमितपणे सेवन केल्यानंतर 2 आठवड्यांकरिता याचं सेवन न करणं हेच योग्य राहील. यानंतर पुन्हा तुम्ही काढा पिण्यास सुरुवात करू शकता.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Home remedies, Lifestyle

    पुढील बातम्या