मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

20-20-20 Rule ठरेल फायद्याचा; मोबाइल-लॅपटॉप वापरणाऱ्यांनी तर फॉलो कराच; वाचा काय आहे नियम

20-20-20 Rule ठरेल फायद्याचा; मोबाइल-लॅपटॉप वापरणाऱ्यांनी तर फॉलो कराच; वाचा काय आहे नियम

स्क्रीन टाइम वाढण्यामध्ये कोविड-19 (COVID 19) हे सर्वात मोठं कारण ठरला आहे. कारण, कोविडमुळे शाळा-कार्यालयं बंद झाली. शिक्षण (Online Education) आणि काम (Work From Home) दोन्हीही गोष्टी पूर्णपणे डिजिटल (Digital) झाल्या. ही बाब आपल्या डोळ्यांसाठी घातक ठरत आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 02 मार्च: डोळ्यांच्या माध्यमातून आपण ही सृष्टी पाहू शकतो. आपल्या अवतीभोवती नेमकं काय सुरू आहे, हे समजण्यासाठी सर्वांत जास्त मदत डोळ्यांची होते. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या लाइफस्टाईलमध्ये आपल्या डोळ्यांच्या आरोग्याकडे (Eye Health) दुर्लक्ष होत आहे. डिजिटल युगामुळे आपला सरासरी स्क्रीन टाइम (Screen Time) खूप वाढला आहे. म्हणजेच दिवसभरात आपण विविध कारणांसाठी स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवत आहोत. हा स्क्रीन टाइम वाढण्यामध्ये कोविड-19 (COVID 19) हे सर्वात मोठं कारण ठरला आहे. कारण, कोविडमुळे शाळा-कार्यालयं बंद झाली. शिक्षण (Online Education) आणि काम (Work From Home) दोन्हीही गोष्टी पूर्णपणे डिजिटल (Digital) झाल्या. ही बाब आपल्या डोळ्यांसाठी घातक ठरत आहेत. यावर उपाय म्हणून तुम्ही 20-20-20 (20-20-20 Rule for Eyes) या नियमाचा वापर करू शकता. यामुळे डोळ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करता येऊ शकते.

दिवसभरातील स्क्रीन टाइमदरम्यान आपण 20-20-20 हा नियम पाळला पाहिजेत. या नियमानुसार, दर 20 मिनिटांनी डोळ्यांना ब्रेक दिला पाहिजे. सलग 20 मिनिटं स्क्रीन पाहिल्यानंतर 20 सेकंदांचा ब्रेक घ्या. या ब्रेकदरम्यान तुमची नजर 20 फूट अंतरापर्यंत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुन्हा कॉम्प्युटर किंवा मोबाईल स्क्रीनकडे पहा. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल. या व्यतिरिक्त ठराविक काळानंतर डोळ्यांची उघडझाप करा, असं केल्यानेसुद्धा डोळ्यांना खूप फायदा होतो. स्क्रीनसमोर जास्त वेळ काम करताना मध्ये छोटे ब्रेक घ्या. या गोष्टी अतिशय सामान्य वाटत असल्या तरीही डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे वाचा-खराब कोलेस्ट्रॉलसाठी या हेल्दी गोष्टी आहारात घ्या, हृदय विकारांची मग चिंता नाही

साधारणपणे जे लोक कॉम्प्युटर, मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनसमोर दोन तास वेळ घालवतात, त्यांना 'डिजिटल आय स्ट्रेन' (Digital Eye Strain) या समस्येचा धोका असतो. पण, भारतात सरासरी सात तास नागरिक स्क्रीनसमोर असतात. यावरून तुम्ही आपले डोळे किती संकटात आहेत, याची कल्पना करू शकता. स्क्रीनसमोर बराच वेळ घालवल्यानं डोळ्यांवर ताण येणं, डोळ्यांत पाणी येणं आणि डोळे कोरडे पडणं (Dry Eyes) यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे, ज्या पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन क्लास आणि वर्क फ्रॉम होममध्ये (Work From Home) आपल्या कामावर लक्ष देता, त्याच पद्धतीनं डोळ्यांच्या आरोग्यावरदेखील लक्ष दिलं पाहिजे.

हे वाचा-झळ वाढणार! ही गोष्ट नियंत्रित केली नाही तर भारताला बसणार तीव्र तापमानवाढीचे चटके

डोळ्यांच्या समस्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास तुमच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. जर तुम्ही फोन किंवा लॅपटॉप जास्त वेळ वापरत असाल तर 20-20-20 हा नियम नक्की अवलंबला पाहिजे. नेत्रतज्ज्ञ (Ophthalmologist) सुद्धा हा नियम पाळण्याचा सल्ला देत आहेत.

First published:

Tags: Eyes damage, Health