मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

ब्रेस्टफिंडिंग करणाऱ्या मातांसाठी; दूध येत नसेल तर बाळाच्या आईने खावेत 10 पदार्थ

ब्रेस्टफिंडिंग करणाऱ्या मातांसाठी; दूध येत नसेल तर बाळाच्या आईने खावेत 10 पदार्थ

आईचं दूध वाढण्यासाठी काही विशेष आहार घेणं गरजेच आहे.

आईचं दूध वाढण्यासाठी काही विशेष आहार घेणं गरजेच आहे.

आईचं दूध वाढण्यासाठी काही विशेष आहार घेणं गरजेच आहे.

  • myupchar
  • Last Updated :

बाळाच्या जन्मानंतर त्याच्या शारीरिक विकासासाठी आईचं दूध अमृतासमान असते. आईच्या दुधात ते सर्व पोषक तत्व असतात जे नवजात बाळाच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असतात. अनेकदा बाळाला आईचे दूध मिळू शकत नाही. कारण ती अशक्त असते. अशा परिस्थितीत नवजात बाळाला पोषक द्रव्ये उपलब्ध होणं मुश्कील होतं. तेव्हा आईचं दूध वाढण्यासाठी काही विशेष आहार घेणं गरजेच आहे, ज्यामुळे बाळ आणि आईच्या आरोग्याला फायदा होईल. जाणून घेऊया अशाच आहाराविषयी.

शतावरी

आई झाल्यावर स्तनांत दूध निर्माण होत नाही अशी तक्रार अनेक माता करतात. अशावेळी महिलांनी 10 ग्रॅम शतावरीच्या मुळांचं चूर्ण दुधासोबत घ्यावं त्यानं फायदा होतो. गर्भवती महिलांना देखील शतावरीने लाभ होतो. गर्भवती महिलांनी शतावरी, सुंठ, मुलेठी आणि भृंगराज समप्रमाणात घेऊन त्याचं चूर्ण करावं आणि ते चूर्ण 1-2 ग्रॅम या प्रमाणात बकरीच्या दुधासोबत घ्यावे. त्याने गर्भातील शिशु स्वस्थ राहतो.

ब्राउन राइस

myupchar.com चे डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितलं, ब्राउन राईस सेवन केल्याने महिलांमधील दुधाची कमतरता पूर्ण होते आणि नवजात बाळांना फायदा होतो. एका अभ्यासानुसार स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी ब्राउन शुगर खूप फायद्याची आणि आरोग्यदायी सिद्ध झाली आहे.

ओटमिल

ओटमीलनं भरपूर ऊर्जा मिळते, त्यात तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. ते पचन ठिक ठेवण्यात मदत करतात. रोज सकाळी नाश्त्यामध्ये एक वाटी ओटमील खाण्यानं दूध वाढतं.

बडिशेप

स्तनपान करणाऱ्या महिलांनी रोज बडिशेप खावी. दूध कमी झाल्यास बडिशेप खाणं फायद्याचं ठरतं. तुम्ही हवं तर बडिशेप घातलेला चहादेखील पिऊ शकता.

मेथी दाणे

मेथीचे दाणे खाल्ल्यानं देखील स्तनातील दूध वाढतं. मोड आलेले मेथीचे दाणे जास्त फायदेशीर आहेत. चवीला ते थोडे कडवट लागतात, पण त्याने स्तनातील दूध वाढण्यास मदत होते.

कच्ची पपई

कच्ची पपई खाण्याने देखील स्तनातील दूध वाढतं. त्याच्या सेवनाने शरीरात ऑक्सिटॉसिनचे उत्पादन वाढते ज्याने स्तनातील दुध वाढण्यास मदत होते.

लसूण

लसूणपण स्तनातील दूध वाढण्यासाठी प्रेरक म्हणून काम करतो. एका संशोधनानुसार ज्या महिलांनी जास्त प्रमाणात लसूण खाल्ला आहे त्यांनी अधिक काळ बाळांना स्तनपान केले आहे.

myupchar.com चे डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितलं, काळ्या तिळाच्या बिया, बीट आणि गाजर खाणं फायद्याचं आहे. काळ्या तिळात अधिक प्रमाणात कॅल्शियम असतं, जे स्तनातील दूध वाढवण्यास मदत करतं. तसंच गाजराचा रस प्यायल्याने पण फायदा होतो. गाजरामधे जीवनसत्व ए, एल्फा आणि बीटा-केरोटीन असतं.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - ब्रेस्ट एनगॉर्जमेंट: लक्षणे...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

First published:

Tags: Health, Woman