Virat Kohli Birthday: आज भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्याने एक पत्रही शेअर केलं. हे पत्र त्याने स्वतःच्या नावाने लिहिलं. कोहली फार फिट आहे. एक्सप्रेस यूकेला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या फिटनेसचं रहस्य सांगितलं. तो काय खातो आणि आपला फिटनसे कसा जपतो हे जाणून घेऊ...
- विराट कोहली सकाळच्या नाश्त्यात तीन अंड्यांचा पांढरा भाग, पालक, आणि पनीर खातो.
- यासोबतच तो ग्रिल्ड बेकन किंवा ताजं स्मोक्ड सालेमनही खातो. यातून त्याला मोठ्या प्रमाणात प्रथिनं मिळतात ज्यामुळे त्याच्या दिवसाची सुरुवात उत्साहाने होते.
- जर त्याला पूर्ण दिवस क्रिकेटचा सराव करायचा असेल तर तो अतिरिक्त उर्जा आणि शक्तीसाठी ड्रायफ्रूट आणि ग्लूटेन- फ्री ब्रेड खायाला प्राधान्य देतो.
- जेवणानंतर ते पचण्यासाठी तो तीन कप लेमन टी किंवा चार कप ग्रीन टी पीतो.
- दुपारच्या जेवणात विराट नेहमी पालक आणि किसलेल्या बटाट्यासोबत ग्रिल्ड चिकन खातो. पण जेव्हा त्याला मटण खावसं वाटतं तेव्हा तो रेड मीट खाण्याला प्राधान्य देतो. एक्सप्रेस यूकेला याचं मुख्य कारण सांगताना विराट म्हणाला की, ट्रेनर बासू जेव्हा त्याला मसल्स वाढवायला सांगतात तेव्हा तो रेड मीट खाण्याचं प्रमाण वाढवतो. नाही तर तो दररोज दुपारच्या जेवणात बटाटा, पालक आणि भाज्या खाणं पसंत करतो.
- रात्रीच्या जेवणात तो सी- फूड खाण्याला प्राधान्य देतो. हे सी- फूड शक्यतो उकडलेलं किंवा ग्रिल्ड असतो. तळलेले पदार्थ तो शक्यतो खात नाही.
- शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी तो ताज्या फळांचा रस, उकडलेलं किंवा ग्रिल्ड खाणं आणि साखरेशिवायची कॉफी पिणं पसंत करतो.
- फिट राहण्यासाठी विराट कोहली दररोज व्यायाम आणि योगसाधना करतो. आठवड्यातील पाच दिवस तो व्यायाम करतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तो कार्डियो करतो. याशिवाय मद्यपान आणि सिगारेटपासून तो नेहमीच दूर राहतो.
वाघिणीसाठी दोन सख्खे भाऊ भिडले, जंगलातील थरारक घटनेचा Viral Video
आता ब्रेकअप झाल्यावरही व्हा खूश, कारण त्याचेही आहेत अनोखे फायदे!
या सोप्या घरगुती उपायांनी कमी करा डोळ्यांखालची काळी वर्तुळं!