Home /News /lifestyle /

Kidney Health : किडनी खराब करू शकतात तुमच्या या चुकीच्या सवयी; वेळीच घ्या काळजी

Kidney Health : किडनी खराब करू शकतात तुमच्या या चुकीच्या सवयी; वेळीच घ्या काळजी

Kidney

Kidney

तुम्हाला माहीत आहे का, आपल्या रोजच्या काही चुकीच्या सवयींचा किडनीवर खूप वाईट परिणाम होतो. जर वेळीच काळजी घेतली गेली नाही तर मूत्रपिंड (किडनी) निकामी किंवा खराब होऊ (mistakes can damage your kidney) शकतात.

    नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : किडनी शरीरातून विषारी घटक आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. किडनी शरीरातून आम्ल बाहेर काढून पाणी, मीठ आणि खनिजे संतुलित करते. नसा, स्नायू आणि ऊतींचे योग्य संतुलन नसल्यास मानवी शरीर योग्यरित्या कार्य करू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या रोजच्या काही चुकीच्या सवयींचा किडनीवर खूप वाईट परिणाम होतो. जर वेळीच काळजी घेतली गेली नाही तर मूत्रपिंड (किडनी) निकामी किंवा खराब होऊ (mistakes can damage your kidney) शकतात. वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर - नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (एनएसएआयडी) वेदना निवारक म्हणून काम करतात. पण बऱ्याच लोकांना माहिती नसते की, त्यांचा अतिवापर किडनीला खूप लवकर खराब करू शकतात. विशेषत: ज्यांना आधीच मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यामुळं वेदनाशामक गोळ्यांचा नियमित वापर कमी करा आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या घ्या. मीठ- उच्च सोडियम (मीठ) असलेला आहार रक्तदाब वाढवण्याचे काम करतो, ज्यामुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच डॉक्टर जेवणात मिठाऐवजी इतर मसाले वापरण्याची शिफारस करतात. प्रक्रिया केलेले अन्न - प्रक्रिया केलेले पदार्थ सोडियम आणि फॉस्फरसने भरलेले असतात, म्हणून त्यांचे सेवन केल्याने आपल्या किडनीला मोठे नुकसान होऊ शकते. उच्च फॉस्फरस असलेले प्रक्रिया केलेले अन्न केवळ आपल्या मूत्रपिंडांना हानी पोहोचवत नाही, तर ते आपल्या हाडांसाठी घातक देखील ठरू शकते. हे वाचा - ‘चंद्रकांतदादांनी संयम राखला असता तर शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत असते’ : गुलाबराव पाटील शरीराला हायड्रेटेड ठेवण्याची गरज - शरीर हायड्रेटेड होत असताना विषारी घटक आणि अतिरिक्त सोडियम बाहेर पडतात. म्हणूनच आपण दिवसा पुरेसे पाणी प्यावे. पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोकाही कमी होतो. डॉक्टर म्हणतात की एका निरोगी व्यक्तीने दिवसातून सुमारे 4 ते 5 लिटर पाणी प्यावे. साखर - साखरेचा जास्त वापर लठ्ठपणाच्या रोगास उत्तेजन देतो आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका देखील वाढवतो. या दोन्ही रोगांमुळे एखाद्या व्यक्तीचे मूत्रपिंड खराब होऊ शकते. म्हणून, आपण गोड बिस्किटे किंवा पांढरी ब्रेड यासारख्या गोष्टी जास्त प्रमाणात खाणे टाळले पाहिजे ज्यात जास्त साखर आढळते. हे वाचा - ऑनलाइन Ludo खेळताना जडलं प्रेम, लग्नासाठी तरुणीने केला 1,650 किमीचा प्रवास; पुढे असा विचित्र Twist आला की… एकाच ठिकाणी बसून काम - दिवसभर एकाच ठिकाणी बसून किंवा शरीर पूर्णपणे निष्क्रिय ठेवल्याने किडनीचे आजारही होऊ शकतात. अशा वाईट जीवनशैलीचा आपल्या किडनीवर खूप वाईट परिणाम होतो. रक्तदाब आणि चयापचय योग्य ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा. मांस - प्राणी प्रथिने रक्तात जास्त प्रमाणात आम्ल निर्माण करतात. हे आपल्या मूत्रपिंडांसाठी नुकसानकारक ठरू शकतात आणि अ‌ॅसिडोसिस होऊ शकत नाही. ‌अ‌ॅसिडोसिस हा एक रोग आहे, ज्यामध्ये मानवी मूत्रपिंड पुरेसे अ‌ॅसिड बाहेर काढू शकत नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Kidney sell

    पुढील बातम्या