मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Child Sleep Tips : तुमचं बाळ रात्री नीट झोपत नाही, खूप रडतं का? मग हे 5 उपाय करून पहा

Child Sleep Tips : तुमचं बाळ रात्री नीट झोपत नाही, खूप रडतं का? मग हे 5 उपाय करून पहा

मुलं अनेकदा रात्री जागून रडतात. अशा स्थितीत पालकांचा त्यांना पुन्हा झोपवण्यात बराच वेळ जातो. यामुळं त्यांची झोपमोडही होते आणि झोप पूर्ण घेता येत नाही.

मुलं अनेकदा रात्री जागून रडतात. अशा स्थितीत पालकांचा त्यांना पुन्हा झोपवण्यात बराच वेळ जातो. यामुळं त्यांची झोपमोडही होते आणि झोप पूर्ण घेता येत नाही.

मुलं अनेकदा रात्री जागून रडतात. अशा स्थितीत पालकांचा त्यांना पुन्हा झोपवण्यात बराच वेळ जातो. यामुळं त्यांची झोपमोडही होते आणि झोप पूर्ण घेता येत नाही.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : लहान मुलांना रात्री झोपायला लावणं (Child Sleep) हे पालकांसाठी सोपं काम नाही. याचं कारण त्यांच्या झोपेचा कालावधी कमी असतो आणि तो खूप लवकर संपतो. मुलं अनेकदा रात्री जागून रडत राहतात. अशा स्थितीत पालकांचा त्यांना पुन्हा झोपवण्यात बराच वेळ जातो. यामुळं त्यांची झोपमोडही होते आणि झोप पूर्ण घेता येत नाही. असं रोज घडणं पालकांसाठी अडचणीचं ठरतं. आज आम्ही तुम्हाला अशा 5 टिप्स सांगणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या लहान मुलांना रोज रात्री चांगल्या प्रकारे (how to sleep child at night) झोपवू शकता.

दिवसभरातील मुलांची दिनचर्या पहा

दि सनच्या रिपोर्टनुसार, तुमच्या मुलांचा दिवसा काय करतात, त्याचा दिनक्रम काय असतो ते काळजीपूर्वक तपासा. लहान मुलं दिवसा 3-4 तास झोपतात का? याचं उत्तर जर 'होय' असं असेल तर, त्यांना रात्री सहजासहजी झोप येणार नाही आणि जरी आली तरी रात्री पुन्हा जाग येण्याची दाट शक्यता असते. म्हणून, लहान मुलांना दिवसा झोप आली तरी मूल अर्ध्या तासापेक्षा जास्त झोपणार नाही असं पहा.

त्यांच्या झोपण्याच्या जागेकडे लक्ष द्या

तुमचं मूल जिथं झोपतं त्या ठिकाणी लक्ष द्या. तिथं चकचकीत प्रकाशाऐवजी हलका अंधार असावा. त्या ठिकाणचं तापमान लहान मुलांसाठी गरम किंवा थंड नसावं. तर, ते आरामदायी आणि आनंददायी असावं याची दक्षता घ्या. मुलाच्या झोपेच्या ठिकाणी कोणतीही खेळणी, पुस्तकं किंवा इतर खेळण्यायोग्य वस्तू असू नयेत. जिथं मूल झोपतं तिथं बाहेरचा किंवा आजूबाजूचा आवाज पोहोचू नये.

हे वाचा - मैत्रिणीच्या बाळाचं डायपर बदलताना समोर आलं भयंकर सत्य; समजताच महिलेनं पतीला दिला घटस्फोट

मुलांना स्वतःहून झोपायला तयार करा

तज्ज्ञांच्या मते, लहान मुलं अनेकदा पालक त्यांना झोपायला सांगतात किंवा त्यांना झोपायला लावतात तेव्हाच झोपतात. त्याऐवजी, पालकांनी मुलांना आपलं आपण झोपायला शिकवलं पाहिजे. असं केल्यानं मुलांना रात्री एकट्यानं आणि स्वतःची स्वतः झोपण्याची सवय होते. तसंच, रात्री जाग आल्यावर ते पुन्हा पालकांनी झोपवण्याची वाट पाहत नाहीत.

हे वाचा - भारताचे पहिले मतदार असणाऱ्या Shyam Sharan Negi यांचा दांडगा उत्साह! वयाच्या 104 व्या वर्षी केलं मतदान

झोपण्यापूर्वी काय करावे?

झोपेच्या 2 तास आधी लहान मुलांना आराम करू द्या किंवा त्यांना वाचण्यासाठी किंवा एक पुस्तक द्या. याशिवाय, तुम्ही त्यांना गोष्टही सांगू शकता. मुलांच्या वयानुसार तुम्ही थोडा वेळ त्यांच्याशी बोलू शकता. यानंतर खोलीतील प्रकाश मंद करावा. असं केल्यानं, मुलाचा मूड हळूहळू झोपण्याच्या दिशेनं जाईल आणि काही वेळानं ते झोपी जाईल.

First published:

Tags: Health Tips, Parents and child, Small baby, Small child