Home /News /lifestyle /

Health Tips: तीव्र डोकेदुखी, अशक्तपणाकडे दुर्लक्ष नको; मेंदुचा हा गंभीर आजार झालेला असू शकतो

Health Tips: तीव्र डोकेदुखी, अशक्तपणाकडे दुर्लक्ष नको; मेंदुचा हा गंभीर आजार झालेला असू शकतो

तीव्र डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नये. यासोबतच चक्कर येणे, अशक्तपणा जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. प्रत्येकवेळी डोकेदुखीवर घरीच पेन किलर खाणे घातक आहे.

  मुंबई, 02 जुलै : अनेकजण डोकेदुखीचा त्रास होत असताना डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेतात. अशा स्थितीत दुखण्यात काही काळ आराम मिळतो. पण, दीर्घकाळ अशी औषध घेतल्याने ही औषधे शरीरालाही अपायकारक ठरतात. महत्त्वाचे म्हणजे तीव्र डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नये. यासोबतच चक्कर येणे, अशक्तपणा जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. सतत तीव्र डोकेदुखी हे ब्रेन ट्यूमरचे कारण असू (Brain Tumor ) शकते. मेंदूतील गाठीला ट्यूमर म्हणतात. गुठळ्या होणे म्हणजे ट्यूमर पेशी आहेत, ज्या एकाद्या ठिकाणी अनियंत्रितपणे वाढतात, ज्यामुळे मेंदूच्या त्या भागावर परिणाम होतो. काही वेळा ही गाठ कर्करोगाचे कारणही बनू शकते. हा आजार सामान्यतः 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये दिसून येतो. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांनाही याचा त्रास होत आहे. ब्रेन ट्यूमरचे प्रकार - जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनमधील एका लेखानुसार, ब्रेन ट्यूमरचे दोन प्रकार आहेत, प्राथमिक आणि दुय्यम (मेटास्टॅटिक) ब्रेन ट्यूमर. प्राथमिक ब्रेन ट्यूमर मेंदूमध्येच विकसित होतो, तर दुय्यम ट्युमरच्या गाठी शरीराच्या इतर कोणत्याही भागातून मेंदूपर्यंत पोहोचतात. यापैकी, दुसऱ्या प्रकारचा ट्युमर जास्त लोकांना होत आहे. प्राथमिक ट्युमरच्या तुलनेत दुय्यम ब्रेन ट्यूमर अतिशय वेगाने पसरतो. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार ब्रेन ट्यूमरची लक्षणे - तीव्र डोकेदुखी - उलट्या होणे - ऐकण्यात किंवा बोलण्यात अडचण - चक्कर येऊन झटका येणे - शरीरात अशक्तपणा जाणवणे - उभं राहणं किंवा चालताना संतुलन बिघडणं हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम ब्रेन ट्यूमरची लक्षणे दिसल्यास काय करावे - यापैकी कोणतीही लक्षणे दीर्घकाळ दिसू लागल्यास ताबडतोब न्यूरोसर्जनकडे तपासणी करून घ्यावी. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी निदान झाल्यास त्यावर उपचार शक्य आहेत. याशिवाय आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यासोबतच निरोगी जीवनशैली, व्यायाम आणि चांगली झोप घेणेही महत्त्वाचे आहे.
  (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Health, Health Tips

  पुढील बातम्या