Home /News /lifestyle /

अंघोळ करताना तुम्हीही प्लॅस्टिकचा स्क्रब वापरता का? मग या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात

अंघोळ करताना तुम्हीही प्लॅस्टिकचा स्क्रब वापरता का? मग या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात

बहुतेक बाथरुममध्ये प्लॅस्टिकचे स्क्रब (Plastic scrub) लटकलेले आढळतील. स्क्रब वापरल्याने त्वचेवरील मृत पेशींची (Dead cells)खपली निघून जाते, म्हणजेच एक्सफोलिएट (Exfoliate) होते आणि त्वचा सुंदर दिसू लागते.

    मुंबई, 13 डिसेंबर : आंघोळीच्या वेळी शरीर घासून स्वच्छ करण्यासाठी लोक अनेकदा प्लॅस्टिक स्क्रब किंवा लूफा (Scrub or Loofah) वापरतात. यामुळे त्वचेवर अधिक फेस तयार होतो, ज्यामुळे त्वचा अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ होते, असे लोक समजतात. यामुळेच बहुतेक बाथरुममध्ये प्लॅस्टिकचे स्क्रब (Plastic scrub) लटकलेले आढळतील. स्क्रब वापरल्याने त्वचेवरील मृत पेशींची (Dead cells)खपली निघून जाते, म्हणजेच एक्सफोलिएट (Exfoliate) होते आणि त्वचा सुंदर दिसू लागते. पण, स्क्रबच्या फायद्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नुकसानही होऊ शकते. स्क्रबचा वापर केल्याने अनेक आजारही होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही त्वचेच्या आरोग्याबाबत गंभीर असाल तर काळजी घेणं (Side effect of plastic scrub) आवश्यक आहे. त्वचेच्या संसर्गाचा धोका इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, स्क्रबमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. ई. कोलाई, स्यूडोमोनास एरुगिनोसा, स्टॅफिलोकोकस, स्ट्रेप्टोकोकस (E. coli, Pseudomonas Aeruginosa, Staphylococcus, Streptococcus) सारखे जीवाणू त्वचेला संसर्ग करू शकतात. बॅक्टेरिया व्यतिरिक्त, स्क्रब देखील बुरशीचे एक मोठे कारण बनू शकतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याचा धोका असतो. याशिवाय, स्क्रबमध्ये अनेक प्रकारचे जंतू असू शकतात, ज्यामुळे त्वचेमध्ये अनेक प्रकारचे संक्रमण होऊ शकते. जर तुम्ही आंघोळ करताना स्क्रब वापरत असाल आणि कधी तुमच्या त्वचेवर जळजळ जाणवू लागली तर स्क्रबमुळे तुमच्या त्वचेला संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. हे वाचा - Iron for Health: आपल्या शरीराला दररोज किती लोह आवश्यक असतं, योग्य प्रमाण जाणून घ्या त्वचेवर सूज सहसा अनेकजण स्क्रब खरेदी करतात कारण त्यांना वाटते की, त्यामुळे अधिक फेस बनेल आणि त्वचेच्या मृत पेशी निघून जाण्यास मदत होईल, परंतु असे होईलच असे नाही. प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगवेगळी असते. कोणाला जास्त फोमची गरज नसते, तर कोणाची त्वचा स्क्रब सहन करू शकत नाही. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जर तुम्ही त्वचेवर स्क्रब जास्त घासलात तर त्वचेवर लालसरपणा दिसू लागतो. यामुळे त्वचेवर जळजळ देखील होऊ शकते. जास्त घासल्यास जिवंत पेशींचा थरही झिजायला लागतो, ज्यामुळे त्वचेवर जखमाही होऊ शकतात. अशा स्थितीत स्क्रबवर बॅक्टेरिया असल्यास ते अधिक घातक ठरू शकते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Lifestyle

    पुढील बातम्या