Home /News /lifestyle /

हेल्दी नव्हे अनहेल्दी ठरेल Milk Powder; साईड इफेक्ट वेळीच माहीत करून घ्या

हेल्दी नव्हे अनहेल्दी ठरेल Milk Powder; साईड इफेक्ट वेळीच माहीत करून घ्या

दूध पावडरमध्ये लॅक्टोज ही दुधात नैसर्गिकरीत्या आढळणारी शर्करा नसते. त्यामुळं शरीराला ऊर्जा मिळत नाही. याशिवाय, दूध पावडरमध्ये कृत्रिम साखर मिसळली जाते जी आरोग्यासाठी हानिकारक आहे.

    नवी दिल्ली, 28 जानेवारी : जर तुम्ही दुधाची पावडर (Milk Powder) आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू खात असाल तर याचं जास्त सेवन करणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं (Milk Powder side effect), हे तुम्हाला माहीत आहे का? दुधाच्या पावडरमध्ये लॅक्टोज ही दुधात नैसर्गिकरीत्या आढळणारी शर्करा नसते. त्यामुळं शरीराला ऊर्जा मिळत नाही. याशिवाय, दुधाच्या पावडरमध्ये कृत्रिम साखर मिसळली जाते जी आरोग्यासाठी हानिकारक आहे. बरेच लोक दुधाऐवजी दुधाची पावडर वापरतात. परंतु इथं तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की, दूध पावडर नैसर्गिक दुधाची जागा घेऊ शकत नाही. कॅल्शियमची कमतरता जर तुम्ही दुधाची पावडर सतत वापरत असाल तर, त्यामुळं शरीरात कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. दूध पावडरमध्ये दुधापेक्षा कमी कॅल्शियम असतं, असं झी न्यूजच्या बातमीत म्हटलं आहे. जर तुम्ही दुधाची पावडर योग्य प्रकारे साठवली नाही, तर त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. ताज्या दुधात B5 आणि B12 जीवनसत्त्व यासारखी पोषक तत्त्वं असतात. परंतु, दुधाच्या पावडरमध्ये ती आढळत नाहीत. ताज्या दुधात फॉस्फरस आणि सेलेनियमचं प्रमाणही दुधाच्या पावडरपेक्षा जास्त असतं. लठ्ठपणा वाढू शकतो लॅक्टोज ही दुधात आढळणारी एक प्रकारची नैसर्गिक साखर आहे. यामुळं शरीराला ऊर्जा मिळते. दुधाच्या पावडरमध्ये दुधाच्या तुलनेत दुग्धशर्करेचं प्रमाण नसतं. त्यात कृत्रिम साखर असते. त्यामुळं त्याचं वारंवार आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास लठ्ठपणा येतो. हे वाचा - Goat Milk : कोरोनापासून बचाव करू शकतं शेळीचं दूध? काय सांगतात तज्ज्ञ पाहा मधुमेहाची समस्या दुधाच्या पावडरचा जास्त वापर मधुमेहाचा धोका वाढवू शकतो. कारण दूध पावडरमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. उच्च कोलेस्टरॉल दुधाच्या पावडरमध्ये कोलेस्टेरॉलही जास्त असतं. ताजं दूध कोलेस्टेरॉल मुक्त असते. दूध पावडरपेक्षा ताजं दूध पिणं अधिक सुरक्षित असतं. हे वाचा - Clove Milk Benefits: लवंग-दूध पिण्याचे हिवाळ्यात आहेत जबरदस्त फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत पचनाची समस्या दुधापेक्षा दुधाची पावडर पचायला जास्त वेळ लागतो. दूध पावडर आणि पाणी यांचं एकमेकांसोबतचं गुणोत्तर / प्रमाण योग्य नसल्यास, ही पावडर योग्यरीत्या विरघळत नाही आणि यामुळं पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Milk combinations

    पुढील बातम्या