मुंबई, 21 डिसेंबर : जेवणानंतर अनेकांना बडीशेप (Fennel Seeds) खाण्याची सवय आहे. बडीशेप हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. जो फक्त खाण्यासाठीच नाही तर माउथ फ्रेशनर म्हणूनही वापरला जातो. बडीशेपमुळे शरीरातील चयापचय क्रिया वाढते आणि कॅलरी जलद बर्न होतात आणि वजन कमी होऊ लागते. त्यामुळे लोक बडीशेप आवर्जून खातात (Benefits of Fennel Seeds). पण बडीशेप खाण्याचे गंभीर दुष्परिणामही आहेत. काही विशिष्ट व्यक्तींनी तर बडीशेप खाणं टाळायलाच हवं (Side effects of Fennel Seeds).
बडीशेपमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक आढळतात. पोटाशी संबंधित समस्यांवर बडीशेप रामबाण औषधाप्रमाणे काम करते. पोट आणि त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. ज्यांना अनेक प्रयत्न करूनही वजन कमी करता येत नाही, त्यांच्यासाठी बडीशेप एक वरदान ठरू शकते. बडीशेप डोळ्यांच्या दृष्टीसाठी चांगली मानली जाते आणि तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठीही ती उत्तम मानली जाते. पण 'टीव्ही 9'ने दिलेल्या बातमीनुसार बडीशेप खाण्याचे दुष्परिणाम काय आहेत पाहुयात.
औषधांसोबत खाऊ नका
तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कोणत्याही प्रकारची औषधे घेत असाल तर या काळात बडीशेप अजिबात खाऊ नका. हे आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकते. तरीही तुम्हाला बडीशेप खायची असल्यास त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
शिंकण्याचा त्रास
तुम्हाला शिंकण्याची समस्या येत असेल तर बडीशेपचे सेवन करू नका. शिंका येत असतना तुम्ही बडीशेप खाल्ल्यास शिंका येण्याचा त्रास वाढेल, तसेच पोटदुखीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
हे वाचा - जगातील अशी ठिकाणं जिथं कधीच थंडी नसते! काही Places तर भारतीयांचे फेव्हरेट
बाळाला स्तनपान
बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांनी बडीशेप खाऊ नये. याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे बडीशेप खाणे आई आणि बाळ दोघांसाठीही चांगली नाही.
त्वचेला नुकसान
बडीशेप हा त्वचेची निगा राखण्यासाठी सर्वोत्तम घटक मानला जात असला तरी त्याचे जास्त सेवन केल्यास त्वचेला फायद्याऐवजी नुकसानीला सामोरे जावे लागते. बडीशेप खाल्ल्याने संवेदनशीलता वाढते आणि उन्हात बाहेर पडणे कठीण होते.
हे वाचा - Health Tips : हिवाळ्यात सुक्या मेव्याचं जास्त प्रमाण असं ठरू शकतं घातक, वाचा सविस्तर
अॅलर्जी
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जीचा त्रास होत असेल तर बडीशेप खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, यामुळे अॅलर्जीची समस्या आणखी वाढू शकते.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle