शरीराच्या स्वास्थ्यासाठी सलाड खाणं फायद्याचं आहे. कच्चं सलाड खाणं खूप स्वादिष्ट असतं. पण वातावरणातील बदलानुसार सलाड खाण्याची पद्धतदेखील बदलली पाहिजे. कारण तसं केलं नाही तर शरीराला त्रास होऊ शकतो. भारतात साधारणपणे जुलै महिन्यात पावसाळा सुरू होतो आणि या मोसमात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून अनेक जण कच्चं सलाड खायला सुरुवात करतात. कच्चं सलाड खाण्याने शरीराला अनेक पोषक द्रव्ये मिळतात, पण पावसाळ्यात कच्चं सलाड खाणं म्हणजे आजारांना निमंत्रण देणं. तर जाणून घेऊ पावसाळ्यात सलाड खाताना काय काय काळजी घ्यायला हवी.
myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, हिरव्या पालेभाज्या आणि इतर कच्च्या भाज्या खाण्याअगोदर त्या स्वच्छ धुवून घ्याव्यात तसंच एकदा पाण्यात उकळून घ्या. कारण पावसाळ्यात किडे आणि अनेक जीवाणूही भाज्यांना चिकटलेले असतात त्याने ऋतुमानानुसार आजार होऊ शकतात.
पावसाळ्यात सलाड खाताना हिरव्या पालेभाज्या टाळाव्यात. कोबी, पालक हे सलाडमध्ये खायला अनेकांना आवडते, पण या भाज्यांमध्ये किडे, जीवाणू आणि विषाणू असतात, जे अनेकदा आपल्या डोळ्यांना दिसत नाही आणि पोटात गेले तर पचनक्रिया बिघडते.
पावसाळ्यात जेव्हा सलाड खाल तेव्हा गरम पाण्यात उकळताना त्यात थोडे मीठ घाला त्याने जीवाणू लवकर नष्ट होतात. पावसाळ्यात काही किडे फळे आणि भाज्यांमध्ये अंडी घालतात जर ते आपण खाल्ले तर ते आपल्या पोटात पण होऊ शकतात.
पावसाळ्यात जेव्हा पिकांना कीड लागते शेतकरी त्यावर कीटकनाशक फवारणी करत असतात. त्याचा परिणाम भाज्यांवर होतो. त्यामुळे पावसाळ्यात कच्चे सलाड खाणं नुकसानदायक होऊ शकते.
या समस्या निर्माण होतात
पावसाळ्यात कच्चं सलाड खाण्याने विशेषतः पोटाच्या समस्या जास्त निर्माण होतात कारण जीवाणू पोटात जाऊन आपली संख्या वाढवतात. त्याने अपचन, वात, पचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता अशा समस्या निर्माण होतात. जर नियमितपणे कच्चं सलाड खाण्याचे शौकीन असाल तर तीन-चार महिन्यातून एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने कृमिनाशक औषध जरूर घ्या, त्याने आजार होण्याची शक्यता कमी होईल. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, काही लोकांना सलाडमधील काही पदार्थांची अॅलर्जी असते, त्यांनी सावधानता बाळगायला हवी.
कच्च्या सलाडला हा पर्याय उत्तम आहे
कच्चं सलाड शरीराला तंतुमय पदार्थ आणि प्रथिने देते. त्याने पचन तर चांगलं राहतंच सोबतच नवीन पेशी निर्माण होतात. पावसाळ्यात जर कच्चं सलाड खाणं टाळायचं असेल तर त्याला पर्याय म्हणून घरीच तंतुमय पदार्थ आणि प्रथिने देणारे मोड आलेले धान्य खाणं उत्तम आहे. मोड आलेल्या धान्यात मठ, मूग, हरभरे, मेथीचे दाणे हे एकत्र करू शकतात. हे खाताना एका गोष्टीकडे लक्ष द्या की ते चांगले अंकुरित होऊ द्या, म्हणजे त्यात आवश्यक पोषक द्रव्ये चांगली निर्माण होतील मगच त्याचे सेवन करा.
अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - आरोग्यदायी आहार
न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.