Home /News /lifestyle /

Monsoon Recipe: पावसाळ्यात ट्राय करा भाताची भजी, पाहा झटपट रेसिपी

Monsoon Recipe: पावसाळ्यात ट्राय करा भाताची भजी, पाहा झटपट रेसिपी

पावसाळ्यात चहा आणि भजी हे जणू अलिखित समीकरणच झालंय. पण तुम्ही कधी भाताची भजी (Rice Pakora) खाल्ली आहे का? पटकन जाणून घ्या सोप्पी रेसिपी.

मुंबई, 29 जून:  पावसाळा (Rainy Season) सुरू झाला की वाफाळलेला चहा (Tea) आणि गरमागरम भजीचा हंगाम सुरू होतो. पावसाळ्यात चहा आणि भजी हे जणू अलिखित समीकरणच झालंय. तुम्ही कांदाभजी, बटाटा भजी, मिरचीभजी, पनीरभजी अशा अनेक प्रकारच्या भजीचा आस्वाद घेतला असेल. ही सर्व प्रकारची भजी बेसनापासून बनवली जाते. पण तुम्ही कधी भाताची भजी (Rice Pakora) खाल्ली आहे का? होय. भाताची गरमागरम कुरकुरीत भजी. नाव ऐकूनच तोंडात पाणी आलं ना. आता ही भजी कशी बनवायची त्याची रेसिपी जाणून घेऊयात.
भाताची भजी करणं खूप सोपं आहे. यासाठी तांदूळ, बटाटे आणि मसाले हे साहित्य लागेल. तुम्ही संध्याकाळ किंवा सकाळच्या नाश्त्यात भाताची भजी बनवू शकता आणि घरातल्या लहान-मोठ्या सर्वांना सर्व्ह करू शकता. तुम्ही ही भाताची भजी हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता आणि सर्व्ह करू शकता. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. चला तर भाताची भजी बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.
भाताची भजीसाठी लागणारं साहित्य
1 कप तांदूळ, 1 कप बेसन, 1 टीस्पून चाट मसाला, 3 कांदे,1 टीस्पून मिरची पावडर, आवश्यकतेनुसार मीठ, 3 कप पाणी, बटाटा, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, 1 इंच आलं, 1 टीस्पून हळद, 3 हिरव्या मिरच्या, 2 कप तेल आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर हे साहित्य तुम्हाला भाताची भजी बनवण्यासाठी लागेल.
भाताची भजी करण्याची पद्धत
सर्वांत आधी तांदूळ धुवून बाजूला ठेवा. आता तांदूळ प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्या. त्याच बरोबर दुसऱ्या प्रेशर कुकरमध्ये बटाटे (Potato) शिजवून बाजूला ठेवा. त्यानंतर 2 बटाटे आणि इतर गोष्टी चिरून घ्या. आता एक चॉपिंग बोर्ड घ्या आणि त्यावर हिरवी मिरची, आलं आणि हिरवी कोथिंबीर चिरा. हिरव्या मिरच्या आणि आलं वेगळ्या भांड्यात ठेवा. उकडलेल्या बटाट्याचे लहान चौकोनी तुकडे करा. बटाटा, भात, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर याचं सारण तयार करा.
आता बॅटर बनवण्यासाठी एक बाऊल घ्या आणि त्यात बेसन, हळद, तिखट, आमचूर आणि चाट मसाला घाला. त्यात पाणी घाला. ते बॅटर म्हणजे बेसनाचं पीठ खूप जाड किंवा खूप पातळ नसावं. बॅटरमध्ये चिरलेला कांदा, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, चिरलेला बटाटा आणि उकडलेले तांदूळ याचं तयार केलेलं सारण टाका.
आता एका कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. आता त्या बॅटरपासून भजी बनवून घ्या आणि त्या डीप फ्राय करा. आता एक प्लेट घ्या. त्यावर टिश्यू ठेवा. ती तळलेली गरमागरम तांदूळ भजी त्यावर काढून ठेवा आणि चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून भजी सजवा. ही भजी बनून तयार आहे. तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत या गरमागरम तांदुळ भजीचा आस्वाद घेऊ शकता.
First published:

Tags: Monsoon

पुढील बातम्या