प्राचीन काळापासून मध (honey) एक आयुर्वेदिक औषध म्हणून वापरलं जात आहे. आजही लोक अॅलोपॅथीच्या औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आयुर्वेदिक औषधं घेत आहेत. अशाच औषधांपैकी एक म्हणजे मध जे खूप उपयुक्त आहे. मधात मुबलक लोह, कॅल्शियम, फॉस्फेट, सोडियम, क्लोरीन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात. त्याबरोबर अँटीसेप्टिक, अँटीबायोटिक गुणधर्म, जीवनसत्त्वं बी 1 आणि बी 6 देखील भरपूर प्रमाणात आढळतं.
मधाचे काय काय फायदे आहेत पाहुयात.
वजन कमी होतं
बर्याच संशोधनातून असं दिसून आलं आहे की मध भूक नियंत्रित करतं, ज्यामुळे वजन कमी होतं. रात्री झोपायच्या आधी मध खाल्ल्यानं जास्त कर्बोदकं जळतात. तसंच चहा, कॉफी किंवा वजन कमी करण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या पेयात साखरेऐवजी मध वापरा. यामुळे वजन नियंत्रणात राहिल. मधासह लिंबाचं सेवन जास्त फायदेशीर ठरेल.
हृदयाची काळजी घेतं
मध सेवन केल्यानं रक्तातील पॉलिफॉनिक अँटीऑक्सिडंट्स वाढतात. ज्यामुळे हृदयरोगापासून बचाव होतो. हृदय मजबूत करण्यासाठी मध खूप उपयुक्त आहे.
रोगप्रतिकार शक्ती वाढवतं मध
मधात अँटीऑक्सिडंट आणि अँटिबॅक्टेरिअल गुणधर्म असतात, याचं नियमित सेवन केल्यानं रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यातून मध आणि लिंबाचा रस मिसळल्यास अनेक समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या पोटाच्या अनेक समस्या दूर होतात.
ऊर्जा वाढते
मधात ग्लुकोज भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे शरीरात ऊर्जेची भरभराट होते.व्यायामापूर्वी अर्धा चमचा मध खाण्याने थकवा जाणवत नाही. आपण चहा किंवा कॉफी पित असाल तर त्यात साखरेऐवजी मध वापरणं अधिक फायदेशीर ठरेल.
रक्तदाब नियंत्रित राहतो
मध रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचंदेखील कार्य देखील करतं. दररोज कोमट पाण्यात 1 चमचा मध मिसळून सेवन केलं तर रक्तदाब संतुलित होतो.
सर्दी-खोकल्यामध्ये फायदेशीर
दररोज 2 चमचे मध खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. त्यातील प्रतिजैविक गुणधर्मांमुळे त्याचं सेवन केल्यास संसर्गजन्य जीवाणू नष्ट होतात.
त्वचेचं सौंदर्य वाढतं
मध त्वचेसाठीही उपयुक्त आहे. अर्धा तास चेहऱ्यावर मधानं मालिश करा. यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. एवढंच नव्हे तर मध त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखं कार्य करतं. यामुळे त्वचा ओलसर राहते. चेहऱ्यावरील मुरुम, डाग आणि कोरडेपणादेखील दूर होतो. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - शैत्य
न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.