Home /News /lifestyle /

14 की 15 जानेवारी? यंदा नेमकी कोणत्या दिवशी साजरी करावी संक्रांत? जाणून घ्या उत्तर आणि कारण

14 की 15 जानेवारी? यंदा नेमकी कोणत्या दिवशी साजरी करावी संक्रांत? जाणून घ्या उत्तर आणि कारण

हिंदू धर्मातील ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या दिवशी सूर्य (Sun) धनु रास (Sagittarius) सोडून मकर राशीत (Capricorn) प्रवेश करतो, त्या दिवशी मकरसंक्रांत साजरी केली जाते.

मुंबई 12 जानेवारी : जानेवारी महिन्यात साजरा केल्या जाणाऱ्या मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) सणापासून (Festival) नवीन वर्षातील सण-समारंभांची सुरुवात होते. साधारण 14 किंवा 15 जानेवारी या दिवशी संक्रांत येते. घरातील दिनदर्शिकेवर (Calendar) तशी नोंदही केलेली असते, त्यानुसार देशभर हा सण साजरा केला जातो. मात्र, यावर्षी संक्रांत नेमकी कोणत्या दिवशी साजरी करावी याबाबत लोकांच्या मनात काहीसा गोंधळ आहे. काहीजण यावर्षी संक्रांत 14 जानेवारीला असल्याचं तर काहीजण 15 जानेवारीला असल्याचं सांगत आहेत. तुमचा देखील असाच गोंधळ उडाला असेल तर काळजी करू नका. आम्ही तुमच्या मनातील हा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हिंदू धर्मातील ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या दिवशी सूर्य (Sun) धनु रास (Sagittarius) सोडून मकर राशीत (Capricorn) प्रवेश करतो, त्या दिवशी मकरसंक्रांत साजरी केली जाते. हिंदू धर्मात सूर्याची ही उदयतिथी स्नान आणि दानधर्मासाठी अतिशय चांगली मानली जाते. मात्र, यावर्षी सूर्याचं स्थान लक्षात घेऊन मकरसंक्रांतीची (Makar Sankranti 2022) तारीख पाहिली असता ती वेगळीच येत आहे. नेमका हा काय प्रकार आहे त्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. Vastu Tips: घरात वारंवार पैशांची चणचण भासते का? वास्तुदोषाचे हे असेल कारण यावर्षीच्या मकरसंक्रांतीचा पुण्यकाळ काशीचे ज्योतिषी (Astrologer) चक्रपाणी भट्ट (Chakrapaani Bhatt) यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी 14 जानेवारी (शुक्रवार) रोजी सकाळी 8 वाजून 49 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळं मकर संक्रांतीचा पुण्यकाळ 15 जानेवारी (शनिवार) रोजी दुपारी 12 वाजून 49 मिनिटांपर्यंत राहील. अशा स्थितीमुळं मकरसंक्रांत 15 जानेवारीला साजरी करणं योग्य आहे. स्नान-ध्यान, दानधर्मदेखील 15 जानेवारीलाच करणं शुभ राहील. तर, द्रुक पंचांगानुसार, दिल्लीला केंद्रस्थानी ठेवून पाहिल्यास यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ 14 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांपासून सुरू होत आहे आणि संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी संपत आहे. अशा स्थितीत दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनीच सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत आहे. या स्थितीच्या आधारावर मकरसंक्रात 14 जानेवारीला साजरी करण्याचा सल्ला दिला जात आहे.

कॅल्शियम युक्त आहे मखाना; त्याचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

स्थानावर आधारित पंचांगामुळे (astrology almanac) पुण्यकाळ वेगळा-वेगळा मिळत आहे. त्यामुळं मकर संक्रांतीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पुण्यकाळ वेगळा मिळत असला तरी दोन्ही दिवस योग्य असल्याचं ज्योतिषांचं म्हणणं आहे. त्यामुळं यावर्षी तुम्ही 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी यापैकी कोणत्याही एका दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा करू शकता. तरीही तुमच्या मनात शंका असेल तर तुमच्या सध्याच्या स्थानानुसार कोणता दिवस जास्त चांगला आहे, हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घेऊ शकता. 14 जानेवारीला 29 वर्षांनंतर आला आहे दुर्मिळ योग यावर्षी 14 जानेवारीला सूर्य आणि शनी ग्रह (Saturn) एकत्र मकर राशीमध्ये असणार आहेत. अशी स्थिती 1993 मध्ये निर्माण झाली होती. त्यानंतर आता 29 वर्षांनंतर असा दुर्मिळ योग तयार होणार आहे.
First published:

Tags: Festival, Makar Sankranti

पुढील बातम्या