मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Cardiac Arrest म्हणजे Heart Attack नव्हे; नेमका काय असतो फरक समजून घ्या

Cardiac Arrest म्हणजे Heart Attack नव्हे; नेमका काय असतो फरक समजून घ्या

याशिवाय हायपर टेन्शन, हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी चहा मुळीच पिऊ नये. यामुळे हृदयावर परिणाम होतो हृदयाचे ठोके वेगाने पडायला लागतात.

याशिवाय हायपर टेन्शन, हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी चहा मुळीच पिऊ नये. यामुळे हृदयावर परिणाम होतो हृदयाचे ठोके वेगाने पडायला लागतात.

Cardiac Arrest आणि Heart Attack हे हृदयाचे वेगवेगळे आजार आहेत.

  मुंबई, 30 सप्टेंबर : 2020 साली हृदयविकारामुळे (Heart Disease) जगभरात जवळपास 1.20 कोटी नागरिकांचा मृत्यू झाला, अशी माहिती 'कोरोनरी आर्टरी डिसीज अमंग एशियन इंडियन' या नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालात दिलेली आहे. भारतात याच वर्षात जवळपास 40 लाख जणांचा मृत्यू यामुळे झाला. भारतासाठी हा आकडा भीतीदायक आहे. भारतातले हे मृत्यू कार्डिअॅक अरेस्ट (Cardiac Arrest) आणि हार्ट अॅटॅक (Heart Attack) या दोन कारणांमुळे झालेले आहेत.

   सर्वसाधारणपणे आपण कार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत, असं मानतो. पण तसं नाही. वैद्यकीय शास्त्रानुसार, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधले वरिष्ठ हृदयरोग विशेषज्ञ डॉ. अमित मित्तल (Dr Amit Mittal) यांनी कार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अॅटॅक या दोन्हींमधला फरक स्पष्ट केला आहे. तसंच, हे दोन्ही प्रकार ओळखायचे कसे आणि त्यापासून बचाव कसा करता येऊ शकतो, हेही त्यांनी सांगितलं आहे.

  हार्ट अटॅक म्हणजे काय?

  डॉ. अमित मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयाला काम करण्यासाठी ऑक्सिजनयुक्त रक्ताची (Oxygenated Blood) आवश्यकता असते. हृदयाला हे ऑक्सिजनयुक्त रक्त कोरोनरी धमन्यांद्वारे (Coronary Artery) पुरवलं जातं. या कोरोनरी धमन्यांमध्ये ब्लॉकेज (Blockage) झालं म्हणजेच अडथळा निर्माण झाला, तर ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत पोहोचणं बंद होतं.

  हे वाचा - हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी या 5 गोष्टींची घ्या काळजी

  पुरेसं रक्त न मिळाल्यामुळे हृदयाच्या पेशी हळूहळू मृत होऊ लागतात. परिणामी हृदयाची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. एक वेळ अशी येते, की तेव्हा हृदयाची कार्यक्षमता (Efficiency) गरजेपेक्षा बरीच कमी होते. त्यामुळे हृदयावरचा ताण खूप वाढतो. त्यामुळे हृदय कार्य करणं थांबवतं. याला वैद्यकीय भाषेत हार्ट अटॅक असं म्हणतात. वेळेवर हृदयविकाराची जाणीव झाली नाही किंवा वेळेवर उपचार झाले नाहीत, तर मृत्यूची शक्यता वाढत जाते.

  कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय?

  डॉ. अमित मित्तल सांगतात, की कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे हृदय अडकणं. हृदय पूर्णपणे काम करणं बंद करतं, तेव्हा त्याला कार्डिअॅक अरेस्ट असं म्हटलं जातं. हे का होतं? तर, हृदयामध्ये सोडियम, कॅल्शियम, आणि पोटॅशियमचे चॅनेल्स असतात. या चॅनेल्समध्ये असंतुलन निर्माण झालं, तर हृदयाची धडधड अनियमित होते. त्याला वैद्यकीय भाषेत व्हीटीबीएस (VTBS) असं म्हटलं जातं. अशा स्थितीत संबंधित रुग्णाला वेळेत इलेक्ट्रिक शॉक दिला गेला नाही, तर त्याचा मृत्यू होतो. शॉक मिळायला जितका वेळ लागेल, त्या प्रत्येक मिनिटाला प्राण वाचण्याची शक्यता 10 टक्के कमी होत जाते. डॉ. मित्तल म्हणतात, की या परिस्थितीतून बचाव करण्यासाठी आता बरीच उपकरणं उपलब्ध झाली आहेत. अतिजोखमीच्या रुग्णांमध्ये ती उपकरणं बसवली जातात.

  हे वाचा - काळजी घ्या तरूणपणातही हार्ट अटॅक गाठतोय; संशोधकांनी सांगितले हे उपाय

  शरीराच्या कोणत्याही भागात आजार असेल किंवा अनियमितता असेल, तर त्याची जाणीव शरीर आपल्याला करून देत असतं. ते संकेत आपल्याला योग्य वेळी ओळखता आले पाहिजेत. हृदयरोगाचा पहिला संकेत अंजायनाच्या रूपातून मिळू शकतो. त्यामुळे शारीरिक हालचाली करताना श्वास लागतो किंवा छातीत दुखतं.

  अशा स्थितीत रुग्णाच्या हृदयाची कोरोनरी आर्टरी ब्लॉक झालेली असते. शारीरिक कष्टांच्या वेळी जास्त रक्तप्रवाहाची गरज असते. तेव्हा हृदयावर ताण आल्याने छातीत दुखतं किंवा धाप लागते. घाबरल्यासारखंही होतं. असे संकेत दिसत असतील, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, असं डॉक्टर अमित मित्तल सांगतात.

  First published:

  Tags: Disease symptoms, Health, Heart Attack, Lifestyle