खोटं बोलण्याची सवय आत्ताच सोडा नाहीतर, तुमच्या व्यक्तीमत्वावरही होईल नकारात्मक परिणाम

खोटं बोलण्याची सवय आत्ताच सोडा नाहीतर, तुमच्या व्यक्तीमत्वावरही होईल नकारात्मक परिणाम

खोटं बोलण्याच्या सवयीमुळे तुमच्या व्यक्तीमत्वावरही नकारात्मक परिणाम होतो. यामागेही विज्ञान आहे. म्हणून 'ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी' असं म्हटलं जातं.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर: जर्मनीचा माजी हुकूमशहा हिटलरचा खोटं बोलण्यामध्ये एक सिद्धांत होता. जर तुम्ही खोटं नीट समजावून सांगू शकलात आणि सतत तेच सांगितलं तर लोकं ते खरे मानायला लागतात. पण हे खोटं बोलल्यामुळे किती नुकसान होऊ शकतं याचा नाझी लोकांना अंदाज नव्हता. नुकत्याच एका अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, खोटे बोलणाऱ्या व्यक्तीला त्या काही काळासाठी फायदा होतो पण दीर्घ काळासाठी त्याला नुकसानच सहन करावं लागतं. या सगळ्यामागे विज्ञान आहे. राजकारण, समाज आणि मीडियाशी आपल्या दररोजच्या घडामोडींमध्ये संबंध येतो. त्यामुळे अनेक लोक खोटं बोलतात. पण लोकं मोठ्या प्रमाणात खोटं का बोलतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? त्याचबरोबर खोटं बोलण्यापासून तुम्ही स्वतःला कसे वाचवू शकता याचे उत्तर आज आपण पाहणार आहोत.

माणूस खोटं का बोलतो?

सामान्यपणे माणसं काही वस्तू मिळवण्यासाठी खोटं बोलतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ, जास्त फायदा मिळवणं, ताकद, पैसे आणि नोकरीमध्ये फायदा मिळण्यासाठी व्यक्ती खोटं बोलत असतो. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील संशोधकांना आढळून आले की, व्यक्ती खोटं बोलायला लागल्यानंतर मेंदूमधील ऐमिग्डाल या भागात नकारात्मक भावना तयार होण्यास सुरुवात होते त्याची लक्षणं दिसून येतात.मुलं जन्मापासून खोटं बोलत नाही.त्यामुळे ही नैसर्गिक गोष्ट नसून समाज आणि घरातील वडिलधाऱ्यांकडून खोटं बोलायला शिकतात.

खोटे बोलणं किती घातक ?

यामध्ये संशोधकांना आढळून आलं, सुरुवातीला तुम्ही जेव्हा खोटे बोलताना तुमच्या मेंदूतील ऐमिग्डालमध्ये नकारत्मक भावना तयार होतात त्या तुम्ही नेहमी खोटे बोलायला लागल्यानंतर होत नाहीत. त्यामुळे खोटं बोलल्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये केमिकल आणि सायकॉलॉजिकलीत बदल झाल्याने याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर नक्कीच परिणाम होतो. मेंदूमधील ऐमिग्डाल या भागामुळे भीती, चिंता आणि आगतिक भावना तयार करण्यास मदत होते. त्यामुळे आपण खोटं बोलत असल्यास आपल्या मनामध्ये भीतीची भावना किंवा पश्चातापाची भावना निर्माण होते.

खरं बोलण्याचं विज्ञान

खरं बोलल्याने आपल्याला नुकसान होईल, अनेकांचा समज आहे. परंतु या सगळ्या गोष्टी चुकीच्या असून लोकांनी हा गैरसमज पसरवला आहे. शिकागो विद्यापीठामध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात हे समोर आले असून ही भीती आणि भ्रम बरोबर नाही. त्याचबरोबर खरं बोलण्याने तुम्हाला फायदा होतो आणि तुम्ही आनंदी राहू शकता. अनेक गोष्टींमध्ये हे सिद्ध झाले असून नातेसंबंध असो किंवा सामाजिक ठिकाण असो या ठिकाणी खरे बोलून तुम्ही आनंदी राहू शकता आणि फायदा देखील होतो. त्यामुळे या अभ्यासातून एकच गोष्ट समोर आली ती म्हणजे 'ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी'.

खोटं बोलण्यापासून सुटका होऊ शकते ?

ही गोष्ट अशक्य नाही. यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांची आणि कुटुंबीयांची मदत घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही स्वतःदेखील प्रयत्न करू शकता.  तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनाला विचारून तुम्हाला खोटं बोलायचं आहे की नाही हे ठरवा.त्यामुळे सुरुवातीला खरं बोलल्यानं तोटा होत असला तरीदेखील नंतर तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे या अभ्यासातून समोर येते, खोटे बोलण्यापेक्षा खरं बोलणे खूप सोपे आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 26, 2020, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading