मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /How to lose weight : गूळ आणि लिंबू वजन कमी करण्यासाठी आहेत उपयुक्त; कसे आणि कधी खायचे?

How to lose weight : गूळ आणि लिंबू वजन कमी करण्यासाठी आहेत उपयुक्त; कसे आणि कधी खायचे?

लठ्ठपणा (Fat) आणि पोटाची चरबी या दोन अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे व्यक्तीचे बाह्य व्यक्तिमत्व तर बिघडतेच पण त्यामुळे शरीर अनेक आरोग्य समस्यांनाही बळी पडतं.

लठ्ठपणा (Fat) आणि पोटाची चरबी या दोन अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे व्यक्तीचे बाह्य व्यक्तिमत्व तर बिघडतेच पण त्यामुळे शरीर अनेक आरोग्य समस्यांनाही बळी पडतं.

लठ्ठपणा (Fat) आणि पोटाची चरबी या दोन अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे व्यक्तीचे बाह्य व्यक्तिमत्व तर बिघडतेच पण त्यामुळे शरीर अनेक आरोग्य समस्यांनाही बळी पडतं.

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : धावपळीच्या या जीवनात, खराब आहार, फास्ट फूडचे अतिसेवन, शारीरिक हालचालींचा अभाव आणि तणाव यामुळे लोक लठ्ठ होत आहेत. काही लोक अनुवांशिकदृष्ट्या लठ्ठपणाला बळी पडतात. लठ्ठपणा (Fat) आणि पोटाची चरबी या दोन अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे व्यक्तीचे बाह्य व्यक्तिमत्व तर बिघडतेच पण त्यामुळे शरीर अनेक आरोग्य समस्यांनाही बळी पडतं. आज आपण गूळ आणि लिंबाच्या मदतीने वजन कमी करण्याची पद्धत (How to lose weight) जाणून घेऊया.

तज्ज्ञ काय म्हणतात

वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी व्यायामासोबतच संतुलित आणि सकस आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आहारात आवश्यक बदल केल्याने शरीरातील चयापचय क्रिया तर सुधारतेच पण वजन कमी होण्यासही मदत होते.

लठ्ठपणामुळे होणारे रोग

आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, लठ्ठपणामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, युरिक ऍसिड वाढणे आणि मधुमेह यांसारख्या धोकादायक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे लठ्ठपणा कमी करणं गरजेचं आहे.

लिंबू आणि गुळापासून बनवलेले डिटॉक्स पेय आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डॉक्टर अबरार मुलतानी सांगतात की, हिवाळ्यात मिळणारा गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. आहारात घेतल्यानं शरीरातील विषारी घटक काढून प्रतिकारशक्ती वाढवते. गुळामुळे आतडेही मजबूत होतात. अशा परिस्थितीत गुळाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते. दुसरीकडे, लिंबू लठ्ठपणा, पथरी, पुरळ आणि अपचन इत्यादीसारख्या अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांवर उपचार करण्यास सक्षम आहे. लिंबू वजन कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आपल्या आहारात लिंबू आणि गुळापासून तयार केलेले डिटॉक्स पेय समाविष्ट करा.

हे वाचा - कहर! जर्मनीत कोरोनाने तोडले सर्व रेकॉर्ड, 24 तासात अचानक वाढली रुग्णसंख्या

असे बनवा

सर्व प्रथम, एक ग्लास पाणी गरम करा.

आता त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला.

आता त्यात गुळाचा छोटा तुकडा घाला.

आता ते चांगले मिसळा.

गूळ पाण्यात चांगला विरघळला की हे पेय पिण्यास योग्य आहे.

मग तुम्ही या पेयात पुदिन्याची पाने देखील टाकू शकता.

हे वाचा - अमिताभ बच्चन ते शाहरुख खान या कलाकारांच्या Diwali Party ची होते बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा

कसे सेवन करावे

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबू आणि गुळापासून तयार केलेले हे पेय नियमितपणे सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. हे आरोग्यदायी पेय रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावे.

First published:
top videos

    Tags: Weight loss, Weight loss tips