या पद्धतीने जाणून घ्या तुम्ही चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडलात की नाही!

या पद्धतीने जाणून घ्या तुम्ही चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडलात की नाही!

हे कधीही विसरू नका की प्रेम ही एक संधी नसून ती एक भावना आहे.

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट- जेव्हा माणूस प्रेमात असतो त्याला चूक- बरोबर काहीच कळत नाही. आपण जे करत आहोत.. आपण जे अनुभवत आहोत तेच बरोबर आहे असा समज प्रत्येकाचा होतो. प्रेमात प्रत्येक नात्याची सुरुवात फार रोमँटिक होते. पण फार कमी नाती अशी असतात जी शेवटपर्यंत टिकून राहतात.याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे प्रेम करणं आणि प्रेमात पडणं फार सोपं असतं पण ते नातं निभवणं तेवढंच कठीण असतं. प्रत्येक नात्यात समर्पण आणि प्रामाणिकपणा असणं फार आवश्यक आहे. नात्यात जर एकाची जरी समर्पणाची भावना नसेल तर ते नातं फार काळ टिकत नाही. चला तर मग कोणत्या उपायांनी तुम्ही तुमचा पार्टनर योग्य आहे की नाही ते जाणून घेऊ.

जोडीदाराच्या कोणत्याही गोष्टीवर तुम्हाला संशय असेल तर ती गोष्ट फक्त मनात ठेवू नका. कोणत्याही गोष्टीची चौकशी करा. जोवर तुमच्या मनातील शंका दूर होत नाहीत तोवर पार्टनरच्या प्रपोजला होकार देऊ नका. अनेकदा आपण मागचा- पुढचा विचार न करता हातातून संधी जाईल या भीतीने होकार देतो. पण नंतर भविष्यात या नात्याची किंमत चुकवावी लागते. पण हे कधीही विसरू नका की प्रेम ही एक संधी नसून ती एक भावना आहे.

नातं म्हटलं तर त्यात प्रेम, तक्रार आणि मान- अपमान या सर्व गोष्टी आल्याच. जर तुम्ही नात्याबद्दल अजूनही निश्चित नसाल तर समोरच्याला कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. कोणत्याही नात्यात येण्याआधी ही गोष्ट लक्षात ठेवा की, मानसिक सुख आणि शारीरिक सुखासोबतच पैशांमुळे नातं अधिक मजबूत होतं.

जर तुमचं एकमेकांवर खरं प्रेम अेसल तर तुम्ही समाधान काय असतं याचा अनुभव घेता. कोणत्याही नात्यात जोडीदारासाठी प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणा नसेल तर ते नातं फार काळ टिकत नाही. कोणीही तुमच्या भावनांशी खेळू नये यासाठी नात्यात पुढे जाण्याआधी या सर्व गोष्टींचा नक्की विचार करण्यात यावा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

कार्डिअॅक अरेस्टने सुषमा स्वराज यांचं झालं निधन, जाणून घ्या याची लक्षणं

पार्टनरला विचारा हे प्रश्न, कळेल किती दृढ आहे नातं

इतरांपेक्षा येतो सर्वात जास्त राग, तर हे ५ उपाय एकदा करून पाहाच

VIDEO: एक कणखर नेतृत्व हरपलं; आठवणीतल्या सुषमा स्वराज

Published by: Madhura Nerurkar
First published: August 7, 2019, 3:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading